Soybean Bajar Bhav: सध्या सोयाबीन बाजार भाव मध्ये चांगलाच चढ-उतार पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसामुळे काही भागांमध्ये आवक घटली असली तरी काही बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहे. राज्यात एकूण 1109 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. यावर्षी इतर वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे उत्पादन देखील कमी झाले आहे. Soybean Bajar Bhav
राज्यात सर्वात जास्त अंजनगाव सुर्जी बाजारामध्ये 663 क्विंटल सोयाबीनचे आवक नोंदवली गेली आहे. तर पैठणमध्ये सर्वात कमी केवळ 11 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. यावरून राज्यातील काही भागांमध्ये अजूनही सोयाबीनची काढणी सुरू आहे असे स्पष्ट होते. दराच्या बाबतीत जळकोट बाजारात सर्वात जास्त दर मिळाला आहे. येथे पांढऱ्या सोयाबीनला कमीत कमी 4300 तर जास्तीत जास्त 4600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. सरासरी दर 4450 रुपये प्रति क्विंटल एवढा नोंदवला गेला आहे. आदर राज्यातील सर्व बाजारांमध्ये सर्वाधिक आहे.
अजनगाव सुर्जी बाजारात पिवळ्या सोयाबीनचा दर 3200 ते 4155 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला आहे. या ठिकाणी सरासरी दर 3700 प्रतिक्विंटल एवढा नोंदवला गेला आहे. या ठिकाणी सर्वात जास्त आवक झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच उलाढाल पाहायला मिळाली आहे. सिल्लोड बाजारात सोयाबीनचा दर 4000 ते 4100 रुपये प्रति क्विंटल एवढा नोंदवला गेला आहे. तर पैठण बाजारात पिवळ्या सोयाबीनचा दर 3590 ते 3916 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला आहे. या ठिकाणी सरासरी दर 3821 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे.
आजचा सोयाबीन बाजार भाव (soybean price today)
| बाजार समिती | जात/प्रत | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | जास्तीत जास्त दर (रु.) | सर्वसाधारण दर (रु.) |
|---|---|---|---|---|---|
| सिल्लोड | — | 35 | 4000 | 4100 | 4100 |
| जळकोट | पांढरा | 385 | 4300 | 4600 | 4450 |
| पैठण | पिवळा | 11 | 3590 | 3916 | 3821 |
| अजनगाव सुर्जी | पिवळा | 663 | 3200 | 4155 | 3700 |
| शेवगाव | पिवळा | — | — | — | — |
बाजारात सोयाबीनची आवक मंदावली असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने मिळालेला दर खूपच कमी आहे. पावसाच्या हलक्या स्तरीमुळे सोयाबीनच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र बाजारात चांगल्या दर्जाची सोयाबीन दाखल झाल्यास दर 4500 पर्यंत मिळतो. यामुळे शेतकरी देखील समाधान असल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवसात आभाळ कमी झाल्यानंतर दर पुन्हा स्थिर आणि आवक मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
