Soybean Bajar Bhav | सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे बाजार भावा बाबत, बाजारभावामध्ये तुफान वाढ झालेली आहे आणि ही वाढ शेतकऱ्यांसाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. गेल्या तीन वर्षापासून ज्या पिकाला योग्य दर मिळत नव्हता त्याच पिकाला सध्या योग्य दर मिळालेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालपासून पिवळ्या सोन्याला दिवस आलेले आहेत. सोयाबीनचा दर इतका वाढला आहे की, शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरलेला आहे. या ठिकाणी सोयाबीन साठी 8,430 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे. Soybean Bajar Bhav
शुक्रवारी सकाळपासून बाजार समितीमध्ये गेट बाहेर ट्रकाच्या रांगा लाग. एका बाजूला शेतकरी आपल्या पोत्यांवर नजर ठेवून उभे होते तर दुसरीकडे व्यापारी आपली बोली लावत होते. कुणी म्हणत होता आमचा मालभारी आहे तर कोणी सांगत होतो भिजवायचा रंगच वेगळा, दर कमी चालणार नाही दरम्यान काही तासातच दर हजार हजार रुपयांची थेट उसळी लागली आणि सगळ्या बाजारात उत्साहाचे वारे वाहू लागले.
चा नंबर ला जो भाव सात हजार चारशे रुपये होता तोच दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला 8430 रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांनाही विश्वास बसत नाही कधी नाही इतके सोयाबीनचे दर वाढले आहेत आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्ट दिसत आहे.
बाजारात 20 हजार कुंटल अधिक सोयाबीनचे आवक झाली होती. मात्र दर्जेदार सोयाबीनला जास्त मागणी होती. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी तर माल पाहता क्षणीच भाऊ काही असो हा मला आम्हीच घेणार असं जाहीर केलं. एकंदरीत बाजार समिती परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु आता पिकाला भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा धीर मिळाला आहे आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोल मिळत आहे. काही व्यापाऱ्याने तर पुढच्या आठवड्यात मालाची आगाऊ बुकिंग सुरू केली आहे.
वाशिम बाजार समितीमध्ये व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोईर यांनी सांगितले की या हंगामात बिजवाई सोयाबीन पहिल्यांदाच एवढा दर मिळवला आहे. व्यापाऱ्याकडून मागणी जबरदस्त आहे आणि बाजारात चैतन निर्माण झाले. आता प्रश्न असा की हा दर टिकून राहिला का ? तर तज्ञांचे मते, आवक आणि गुणवत्ता या मध्ये संतुलन राहील तर दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे पीक मर्यादीमध्ये असल्याने, येत्या काही दिवसात तर आणखी वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आता भविष्यामध्ये सोयाबीनचे दर कसे राहतात याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | Soybean Bajar Bhav: सोयाबीनला किती दर मिळतोय? जाणून घ्या सोयाबीन बाजार भाव