Soybean Cotton Subsidy : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मागच्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती. ही मदत 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 49 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. यासाठी 2300 कोटी रुपये चा निधी वितरणास मान्यता दिली आहे. Soybean Cotton Subsidy
शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान आता जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. परंतु अनेक असे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती अद्यापही अनुदान जमा झालेले नाही. राज्यातील जवळपास 49 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. परंतु काही शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याच दिसून येत आहे. पण शेतकऱ्यांना काळजी करायचं कोणत्याही कारण नाही. कारण पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे असे कृषी आयुक्तालयाकडून पष्ट करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान मिळणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार सरकारांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर असेल तर किंवा दोन हेक्टरचे अनुदान मिळणार आहे. दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन लागवड केलेली असेल तर दोन्हीही पिकांसाठी एकूण 20 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची ई- पीक पाणी राहिले आहे. पण अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना बी मदत मिळणार आहे आधार संमती पत्र आवश्यक आहे..
तुम्हाला मिळाले नाही अनुदान
राज्य सरकारांतर्गत एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावरच्या अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक आणि ई- KYC करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेपूर्ण केवायसी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.