Soybean market price : राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, सोयाबीनला काय मिळाला दर पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean market price | सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे बाजार भाव बाबत. काही दिवसांपासून सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचे चित्र होते. गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन हे पीक नियमित बाजारभावामुळे वाया गेले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. राहता तालुक्यातील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 4686 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे तर किमान दर 4200 आणि सरासरी 4445 रुपये एवढा देण्यात आलेला आहे. Soybean Market Price

बाजार समितीमध्ये फक्त चारच कुंटल आवक झाली होती पण थोड्याशा मालाला अपेक्षेपेक्षा जास्त दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वातावरण पसरला आहे.

त्याचबरोबर गहू आणि मकाचेही दारात फारशी फरक नसली तरी स्थिती चांगली दिसून आली. गावाला सरासरी 2556 रुपये तर मकेला पंधराशे चाळीस रुपये ते 1600 रुपये एवढा दर मिळाला. मक्याची 28 क्विंटल इतकी आवक झालेली आहे.

दरम्यान, मुगाला देखील चांगला दर मिळाला असल्याची बातमी समितीने सांगितले आहे मुगाचा सरासरी भाव सात हजार शंभर रुपये एवढा नोंदवण्यात आलेला आहे. बाजार समितीमध्ये सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोठे यांनी सांगितलं की सध्या बाजारात सोयाबीनचा दर्जा बऱ्यापैकी चांगला येत असल्याने दरात थोडीशी सुधारणा झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीचा योग्य विचार करून. सोयाबीनचा दर काहीसा वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा बाजराकडे लागले आहेत थोडा दर आणखी वाढला तरी खर्च नाही गेला असं गावातील शेतकरी सांगत आहेत.

हे पण वाचा | सोयाबीन बाजारभावात तेजी! जालना-लातूर आघाडीवर; जाणून घ्या राज्यातील सोयाबीन बाजार भाव

Leave a Comment

error: Content is protected !!