SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक जाहीर होतात विद्यार्थ्यांमध्ये आता परीक्षेची तयारी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. परीक्षा ची तारीख समोर आल्यानंतर विद्यार्थी अधिक जोमाने आणि मनातून अभ्यास करत आहेत.
बारावीचा पहिला पेपर कधी होणार?
मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा मंगळवारी 10 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर बुधवार 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. यादरम्यान HSC विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील सर्व मुख्य विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे प्रयोगिक, तोंडी, श्रेणी आणि मूल्यांकन परीक्षा या लेखी परीक्षा पूर्वीच पूर्ण करून घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा परीक्षा आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तोंडी परीक्षा या सर्व परीक्षा कालावधीत पार पडणार आहे.
दहावीच्या परीक्षांची सुरुवात कधी होणार?
इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा शुक्रवारी 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर शेवटचा पेपर 18 मार्च 2026 रोजी संपणार आहेत. राज्यभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणारा असून यासाठी शाळा आणि शैक्षणिक वर्ग आधीपासूनच तयार ठेवावी लागणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2020 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहून प्रयोगीक काम सादर करावे लागणार आहे.

शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र, कला यासारख्या विषयांचे मूल्यांकन मात्र शाळा स्तरावरच केले जाणार आहे. मंडळाने शाळा आणि कनिष्ठ विद्यालयांना दिलेल्या कालावधीत या सर्व परीक्षा पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्य लेखी परीक्षा पूर्वीच सर्व गुणांची नोंद पूर्ण होणे आवश्यक आहे. SSC-HSC Exam Dates
अर्ज भरण्यास सुरू..
2026 मध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक 17 सादर करण्याबाबत देखील मंडळांनी महत्त्वाची सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज एक नोव्हेंबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भरायचा आहे. अर्ज वेळेत न भरल्यास प्रति दिवस वीस रुपये विलंब शुल्क आकारला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विलंब न करता त्वरित आपला अर्ज भरून घ्यावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाणार आहेत.
महामंडळाचे सचिव दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, वेळापत्रक पाहून योग्य अभ्यासाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला आहे. त्यामुळे वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे आणि आपल्या अभ्यासात सातत्य ठेवावे. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा संदेश..
विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाला पुढील काही महिन्यासाठी ध्येय म्हणून ठरवावे. मोबाईल सोशल मीडिया आणि बाहेरील जीवन बाजूला ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम यश मिळेल. कारण ही परीक्षा फक्त गुणांची नाही तर तुमच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचे वळण ठरणार आहे. थोडक्यात पाहिलं तर बारावीचे पेपर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत असणार आहेत. आणि दहावीचे पेपर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 नोव्हेंबर 2025 आहे. ही सर्व माहिती लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी उत्साहाने अभ्यासाची तयारी सुरू करावी. कारण 2026 मधील फेब्रुवारी मार्च महिना तुमच्या आयुष्यातील निर्णय ठरणार आहेत. वेळ हातातून गेली नाही त्यामुळे आजच अभ्यासाला सुरुवात करा आणि यश मिळवा.
