Surya Transit 2025: भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार आजचा दिवस खूप खास मानला जातो. कारण आज दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस सुरू होत आहे. या दिवशी घरोघरी गाईंचे पूजन केले जाते त्याचबरोबर शेतीची समृद्धी आणि लक्ष्मी प्रवेशाचं स्वागत केले जाते. त्याचबरोबर या दिवशी आणखीन एक खगोलिक घटना घडते ती म्हणजे सूर्य संक्रमण. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा अधिपती मानला जातो आणि त्याची राशी बदल म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास आणि धनप्राप्तीचे संकेत असतात. यावेळी सूर्याच्या संक्रमणामुळे पाच राशींवर विशेष लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवला की आमदार नाहीसा होतो त्याचप्रमाणे या राशींच्या आयुष्यात देखील अंधार नाहीसा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच राशी आहेत.
- मेष राशी—
मेष राशींच्या लोकांसाठी हा सूर्य संक्रमणाचा काळ खूप चांगला जाणार आहे. या राशीतील लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, काहींना तर पदोन्नती मिळेल. व्यवसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. घरात तुमच्या मतावर निर्णय घेतले जातील. कुटुंबामध्ये सन्मान वाढेल. रोज सकाळी सुरदर्शन घ्या आणि मनोभावे प्रार्थना करा. स्वतःहून तुमच्या दारात येईल, त्याचबरोबर सोने खरेदी करण्याचा योग निर्माण होईल.
- सिंह राशी—
शहराशीचे स्वामीच सूर्य आहेत, त्यामुळे या राशीतील लोकांसाठी हा दिवस विशेष शुभ असणार आहे. समाजात तुमची ओळख वाढेल लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील प्रशासन राजकारण शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं नाव उज्वलित होईल लोक तुम्हाला ओळखतील असं यश मिळणार आहे. घरामध्ये तांब्याचे सूर्य यंत्र ठेवा सकारात्मक ऊर्जा कायम राहील. Surya Transit 2025
- धनु राशी —
या राशीतील लोकांसाठी सूर्य संक्रमण हा काळ खूप प्रगतीचा आणि उत्साहाचा राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना विशिष्ट करून पाठिंबा मिळेल काहींना तर नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल त्याचबरोबर पदोन्नतीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ही योग्य वेळ ठरणार आहे. परदेश प्रवास घडण्याची संधी मिळू शकते. मागील मेहनतीचे फळ हाताशी लागेल अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- कुंभ राशी—
कुंभ राशीतील लोकांसाठी सूर्य सक्रमण आर्थिक आणि कौटुंबिक लाभ घेऊन येत आहे. व्यवसायात मोठा धनलाभ मिळू शकतो. जुने जमिनीचे किंवा इतर वाद मिळतील आणि नवीन करारातून पैसे मिळतील. लग्नाच्या योग निर्माण होऊ शकतो. योग्य लाइफ पार्टनर मिळण्याचा योग तयार होईल. मार्केटिंग कम्युनिकेशन किंवा विक्री क्षेत्रात असणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. रविवारी गुळ आणि गहू दान करा ग्रहदोष संपेल आणि नशीब खुलून धनप्राप्ती होईल.
- मीन राशी —
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण म्हणजे नव्या पेरण्याचे किरण आहे. काहीतरी मोठं साध्य करायची ऊर्जा निर्माण होईल. पूर्वी अडलेली कामे अगदी गती धारण करतील. पूर्वजनांचा आशीर्वाद आणि घरातील आनंद मोठ्या प्रमाणात वाढेल. आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांतता मिळेल. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला जीवनात प्रकाश निर्माण होईल. या राशीतील लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा कायम राहील.
(टीप: वरील दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ वाचकांच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. कृषीन्यूज 24×7 केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती पूर्णपणे खरी आहे असा कोणताही दावा आम्ही करत नाही.)