Today weather update : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल; या 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today weather update | महाराष्ट्राच हवामान पुन्हा एकदा तापायला लागल आहे. हवामानात बदल झाला असून राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या ढगांचा पसाराचा राज्याच्या दिशेने सरकतोय. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन बाजूने वादळ तयार झाली आहेत एक पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि दुसरं थेट अरबी समुद्रातून ! Today weather update

गेल्या काही दिवसांपासून थोडासा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा एकदा आकाशाकडे पहिल्यावर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवला आहे. राज्यात वारे वाढले, विजांचा कडकडाटात सुरू झाला आणि हलका पाऊस देखील पडू लागलेला आहे. हवामान खात्याने पुढचे 24 तास महत्त्वाचे सांगितले आहेत.

बंगालच्या खाडीतील वादळांचा वेग वाढला!

पश्चिम बंगालच्या खडीत तयार झालेला चक्रीवादळ आता पुन्हा एकदा ओडिसा कडे सरकल आहे. तिथून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्राच्या सीमे कडे येण्याची शक्यता आहे. कालपर्यंत या वादळाचा वेग तब्बल 75 किमी प्रतितास होता. त्याची तीव्रता कमी झाली असली तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार जवळ निश्चित आहे. हवामान तज्ञांनी सांगितला आहे की वादळाचा मार्ग जर थोडासाही दक्षिणेकडे वळाला, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तरेकडील जिल्ह्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात देखील धोका ?

याच दरम्यान अरबी समुद्रात दुसरे वादळ मध्यरात्री अचानक तीव्र झालं. समुद्रातल्या लाटांनी जोर धरला, आणि उत्तर पश्चिम दिशेने ते सरकतंय. या वादळाचा पुढचा टप्पा पाकिस्तानच्या दिशेने असला तरी त्याचा कडा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला असणार आहे अशी संकेत हवामान खात्याने दिला आहे. यावेळी कोकण पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे.

राज्यात आज सकाळ धरूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात हलका पाऊस, तर विदर्भात आणि मराठवाड्यात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 5 ऑक्टोबर रोजी विदर्भात काही भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमी वरती शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी घ्यावी, सोयाबीन, कापूस या पिकांसाठी वाऱ्यांचं आणि पावसांचे नुकसान टाळण्यासाठी बांध मजबूत ठेवावेत, सूचना कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

1 thought on “Today weather update : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल; या 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट”

Leave a Comment