Toyota ची दिवाळीत जबरदस्त धडाकेबाज कामगिरी! ऑक्टोबर महिन्यात तब्बल 43 हजार गाड्या विक्री, नवा विक्रम रचला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toyota Car News |  वर्षभरातून सर्वात मोठा येणारा दिवाळी सण हा सर्व कडे जल्लोसात साजरा करण्यात आला. परंतु याच महिन्यामध्ये टोयोटा कंपनीने सणासुदीच्या मुहूर्तावर मोठा विक्रम नोंदवला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये कंपनीने तब्बल 42,892 गाड्या विक्री केल्या ज्यामध्ये देशांतर्गत विक्री 40,257 आणि निर्यात 2,635 युनिट इतकी झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 30,845 गाड्या विकल्या गेल्या होत्या, म्हणजे तब्बल 39% वाढ नोंदवण्यात आली आहे!Toyota Car News

ही आकडेवारी बघून एकच गोष्ट स्पष्ट होत आहे लोकांचा विश्वास अजून देखील टोयोटावर ठाम आहे आणि कंपनी दिवाळीत ग्राहकांची पहिला पर्याय ठरली आहे.

विक्रीत जबरदस्त झेप महिन्याभरात 38% वाढ!

सप्टेंबरच्या तुलनेत टोयोटा ने ऑक्टोबर महिन्यात 38% अधिक गाड्या विकल्या आहेत. सणसदीचा हंगाम, आकर्षक ऑफर्स आणि GST दरात झालेल्या कपातीमुळे टोयोटाच्या शोरूम मध्ये ग्राहकांची गर्दी वाढली.

नव्या एडिशन मुळे वाढला क्रेज

कंपनीने नुकतीच दोन भन्नाट एडिशन बाजारात आणली Urban Cruiser Hyryder Aero Edition आणि Fortuner Leader Edition. या दोन्ही मॉडेल्सना लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी बुकिंग्स ओव्हर फ्लो झाल्या आहेत. खास डिझाईन, प्रीमियम फीचर्स आणि दमदार रोड प्रेझेन्स यामुळे या गाड्या सध्या सोशल मीडियावर ही ट्रेडिंग मध्ये आहेत.

जुनी गाडी विकायची? टोयोटा ने सुरू केला प्री-ओन्ड कार शोअरूम !

ग्राहकांच्या सोयीसाठी टोइटाने चंदीगड मध्ये प्री-ओन्ड कार आउटलेट सुरू केला आहे. त्यामुळे टोयोटाच्या जुन्या गाड्यांची खरेदी विक्री आता अधिक पारदर्शक आणि विश्वासह वाढणार आहे.

तर पैठणी 2030 पर्यंत भारतात तब्बल 15 नवीन मॉडेल लॉन्च करण्याची योजना जाहीर केली आहे. यामध्ये काही SUV, एक चांगल्या प्रकारच पिकप ट्रक आणि काही सुझुकीकडून मिळालेल्या गाड्या असतील. जपान MOBILITY शो 2025 मध्ये टोयोटा ने आपल्या Land Cruiser FJ सुद्धा सादर केला असून ही SUV भारतात 2028 पर्यंत लॉन्च होणार आहे.

तर सध्या बिदडी कर्नाटक येथे कंपनीचा मोठा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, पण आता टोयोटा महाराष्ट्रात देखील पाऊल टाकणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल तीन अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक करून कंपनी नवीन उत्पादन केंद्र उभारणार आहे. त्यामुळे राज्यात हजारो रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे..

Leave a Comment