Tur Bajar Bhav: तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या हंगामामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसताना पाहायला मिळत होता. परंतु काही बाजार समितीमध्ये भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Tur Bajar Bhav
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामात आत्तापर्यंत 38 हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे. यंदा तालुक्यामध्ये चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन झालेले आहे मात्र काही भागात धुके व रोगराईमुळे पिकांचे नुकसान देखील झाले आहे. तर उर्वरित भागामध्ये उत्तम उत्पादन निघालेले आहे.
तुरीचे उत्पादन
यावर्षी चांगल्या पावसाच्या अभावामुळे कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जेऊर, उमरगे, रामपूर, गौडगाव, तोळणुर, नगणसुर आणि निमगाव सारख्या नदीकाठच्या गावामध्ये धुक्यामुळे 70% क्षेत्रातील तूर खराब झालेले आहे. तसेच मैद्रीशी, दुधनी, हुन्नूर, वागद दरी, सलगर, तडवल आणि कर्जगी या भागामध्ये चांगल्या दर्जाचे उत्पादन झालेले आहे.
तुरीच्या या चार प्रकारच्या बाजारात बोलबाला.
अक्कलकोटचा तुळजापूर, आळंदी, इंडि, अफजलपुर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि उमरगा या भागांमधून तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पिंकू, जी भारजी 811 मारुती आणि पांढरी अशा चार प्रकारच्या तुरी बाजारामध्ये येत आहे त्यामधून पिंकू प्रकाराला सर्वाधिक मागणी पाहायला मिळत आहे.
उत्पादन आणि दर
- सरासरी प्रति एकर 5 ते 7 क्विंटल उत्पादन निघत आहे.
- बाजारात रोज 1500 ते 2000 क्विंटल तुरीची आवक होत असून, आतापर्यंत 37 हजार क्विंटल तूर दाखल झालेले आहे.
- प्रत्येक क्विंटल ला 6500 ते 8500 रुपयापर्यंत दर मिळत आहे.
- माणसांकडून हाताने केलेल्या तुरीला चांगले दर मिळत आहेत, तर हार्वेस्टिंग मशीन द्वारे काढलेल्या तुरीला कचरा व ओलावा अधिक असल्याने जर कमी मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
मागील पाच दशकातील सर्वाधिक बंपर उत्पादन यंदा शेतकऱ्यांना मिळालेले काही भागात हलक्या प्रतीची तूर बाजारात येत असून, त्यांना कमी दर मिळत आहे. मात्र, चांगल्या दर्जाच्या तुरीला 8100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. परिणामी, बाजार तुम्ही त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची वरदान होत असून संपूर्ण परिसरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे.