Unseasonal Rain : महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा हाय अलर्ट!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Unseasonal Rain | राज्यामध्ये दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. अनेक ठिकाणी  फराळी करण्याचे, लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याचे अपडेट शेतकऱ्यांचा नागरिकांना इशारा देणारी ठरली आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग सह मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, बीड, या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. या मुळे आधीच अतिवृष्टी सावरत असतानाच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली. Unseasonal Rain

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मोसमी पावसाने अधिकृतपणे एक्झिट घेतली असली तरी आता या नव्या प्रणालीमुळे पुन्हा पावसाचे ढग जमले आहेत.

तीन दिवस सलग पाऊस; येलो अलर्ट जारी!

पुढील तीन दिवस राज्यात पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. 23 ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याना पावसाचा इशारा. 24 ऑक्टोबरला पावसाचा पट्टा आणखी वाढणार असून पुणे, नगर, अमरावती, नागपूर, बुलढाणा, अकोला, यांचा ही समावेश. 24 ऑक्टोबरला कोकणापासून विदर्भ पर्यंत जवळपास संपूर्ण बीड जिल्ह्यात पावसाची शक्‍यता.

बीड जिल्ह्यात विशेष खबरदारी

बीड जिल्ह्यात हवामान खात्याने सलग तीन दिवसाचा येलो अलर्ट दिला आहे. कल आष्टी तालुक्यात दमदार पाऊस झाला तर सकाळी काही भागात हलका पाऊस पडला. बीड जिल्ह्यांना यंदा वार्षिक सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला, म्हणजे 925 मिलिमीटर इतकी नोंद झाली. पण या पावसाने अनेक ठिकाणी पिकांच नुकसान केलं. आता ऐन काढणीच्या आणि कापूस विष्णूच्या वेळीच पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये एक अस्थिरता निर्माण झाली आहे. आता पुढील काळात हवामान कसे राहते याकडे पाहण्यासारखं राहणार आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांची चिंता वाढली! मान्सूनची प्रतीक्षा लांबणार, हवामान विभागाचा नवीन अंदाज…

Leave a Comment