Weather Alert | शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रात मोठा फटका, पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! या जिल्ह्यांना इशारा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Alert | ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये अगदी शांत वातावरण होतं. त्यानंतर शेतकऱ्यांना एक मोकळा श्वास घ्यायला वातावरण मिळाल. शेतकऱ्यांना वाटलं की आता पाऊस संपला आहे, परंतु पुन्हा एकदा पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अरबी समुद्रा तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हवामानात खळबळ उडाली आहे. हळूहळू वाऱ्यांचा वेग वाढतोय, ढगाळ वातावरण राज्यात तयार झाले आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. Weather Alert

हवामान खात्याने दिलेला इशारामध्ये, राज्यातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव या भागात थेट जाणवेल, तर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईमध्ये गेले काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली होती. पण आता ढगाळ वातावरण, अधून मधून पावसांच्या सरी आणि दमट उकाडा पुन्हा जाणवणार आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल आहे. ठाणे आणि पालघर परिसरात मंगळवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रात पाऊस थांबला असला तरी सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर परिसरामध्ये तापमानात वाढ झाली आहे. दोन दिवसात हवामान स्थिर राहील, पण 8 ऑक्टोबर पासून पुन्हा हवामानात बदल होईल आणि पावसाची पुनरागमानाची चिन्ह दिसते.

तर उत्तर महाराष्ट्रात देखील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. रविवारी रात्रीपासून या भागात वातावरणात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात, जोरी आणि कडधान्यांचे पीक अर्धवट अवस्थेत ठेवले आहेत. त्यामुळे पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे.

तर मराठवाड्यात हवामानाने पुन्हा कोंडी केली आहे. दारू शिवानी बीडच्या काही भागात रविवारी मुसळधार पाऊस झाला, पण आज छत्रपती संभाजीनगर आणि आश्वासच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा नाही. तरीदेखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता कायम आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट जाहीर केला आहे.

एकंदरीत हा सविस्तर हवामान अंदाज पाहता शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आपले पिकांची देखील काळजी घ्यावी असा सल्ला हवामान तज्ञांनी दिलेला आहे. आता येणारा काळच ठरवेल महाराष्ट्रात कसे वातावरण राहील.

हे पण वाचा | Today weather update : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल; या 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट

Leave a Comment