Weather News | दिवाळीच्या तोंडावर ती पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती एक मोठं संकट निर्माण झालेलाl आहे. आत्ताच आलेला ताज्याअपडेट नुसार, भारतीय (IMD WEATHER) हवामान विभागाने पुन्हा एकदा मोठा इशारा दिलेला आहे. पुढील 24 तासात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता, परंतु आता दिवाळी सारखा मोठा सण आणि यावरती पावसाचा तडाका शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. आधीच हातात तोंडाशी आलेले पीक डोळ्यात देखत चिखलात मिळालं. मराठवाड्यात तर एवढे मोठ नुकसान झाले की तिथल्या शेतकऱ्यांना सावरणं देखील कठीण झाल आहे. आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याचा हा इशारा शेतकऱ्यांचा अंगावर काटा आणणारा आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पासून पुढील तीन दिवसांपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त असल्याचं हवामान खातं सांगत.
कालच जोरदार पावसाचा व वादळीवाऱ्यांचा तडाका कोकण आणि ठाणे भागात बसलेला आहे. काही ठिकाणी झाडी पडली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संध्याकाळचे वेळा आकाश काळभोर झालं आणि नागरिकांची धावपळ उडाली. दिवाळी जवळ आली असली तरी अजून पाऊस कमी होण्याचं नाव घेत नाही.
हवामान खात्याच्या इशारानुसार, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटा जवळ 5.8 किमी उंचावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. तसेच केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे या वाऱ्यांचा झोतामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचा क्षेत्र तयार होतोय, त्यामुळे हा पाऊस अजून काही दिवस ठाण मांडून बसण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि कोकणातील काही भागात कालच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, जालना, सांगली या भागांमध्ये लोकांना अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी शेतात पाणी साचलं, तर काही ठिकाणी नुकतीच वाळवण केलेली धान्य पुन्हा ओली झाली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा जो राहणार आहे विशेष कोकण किनारपट्टीवर विजांचा कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष देऊन योग्य ते नियोजन करायचा आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | Weather Alert | राज्याच्या वातावरण पुन्हा एकदा मोठा बदल, हवामान खात्याचा या 21 जिल्ह्यांना अलर्ट