Weather Prediction : ऐन दिवाळीत राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता; जाणून घ्या राज्यात कसे राहणार हवामान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Prediction : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ऐन दिवाळीमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढणार आहे. कारण, राज्य मध्ये अनेक ठिकाणी सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू आहे. तसेच शेतातील काही पीक काढणीवर आलेले आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मध्ये कापूस वेचणी सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढणार आहे. चला तर नवीन हवामान अंदाज जाणून घेऊया. (On the eve of Diwali, heavy rains are predicted in the state and farmers may be hit hard, so farmers should keep this weather forecast in mind. )

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडू, पदुचेरी, कराईकल, केरळ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये आज थंडीला सुरुवात झाली असून डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू झालेली आहे. Weather Prediction

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे राज्यातील रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आलेला होता. परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे टेन्शन वाढणारी बातमी आलेली आहे. राज्यातील आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांची व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे. कारण अचानक येणाऱ्या पावसाने चांगला मोठा फटका बसू शकतो. हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून मदत होणार आहे.

Leave a Comment

x
error: Content is protected !!