राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, दिवाळीपूर्वी राज्यातील या भागांना इशारा नवीन अंदाज पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update 18 October 2025 | दिवसेंदिवस वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याचा इशारा नागरिकांना नक्कीच मोठा फटका देणार, हे आता निश्चित झालेल आहे. कारण आता दिवाळीचे दिवस जवळजवळ आलेले आहेत आणि बाजार मध्ये गर्दी वाढली आहे. लोक घराबाहेर पडत आहेत मान्सून माघारी फिरला असला तरी हवामान खात्याने पुन्हा एकदा आपला इशारा स्पष्ट केला आहे. दक्षिण सागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोनिक सेल्क्युलेशन मुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा संकट निर्माण झालेल आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अलर्ट जारी केलेला आहे यामुळे नागरिकांनी सावध राहावं. Weather Update 18 October 2025

ऐन दिवाळीमध्ये पावसाचे मोठे चित्र निर्माण झाला असून या विघ्नामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तर उकाड्याने हैराण झालेल्या राज्यात आता पुन्हा एकदा विजांचा कडकडाटात आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण भागावरती दिसून येतोय.

त्याच पार्श्वभूमी वरती राज्यातील कोकणात सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी अशा या जिल्ह्यांमध्ये आज विजांसह पावसाची शक्‍यता आहे. तर मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, परभणी या भागात ढगाळ वातावरण निर्माण झालेल आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार काही ठिकाणी गारा पाडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा मनात मध्ये भीतीच सावट आहे. दिवाळी आली पण आकाशात अजूनही पावसाचे डोळे आलेच दिसतात असे एक शेतकरी म्हणाला.

हवामान तज्ञांच्या मते, पुढे 48 तासात राज्यात अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कारण अरबी समुद्रातून अजूनही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. याचाच परिणाम पुढील दोन दिवस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो. दक्षिण भारतातील राज्यांवरती मुसळधार पाऊस व संकट आधी सुरू झाला असून त्याचा हलकासा परिणाम महाराष्ट्रावरती जाणवत आहे. मान्सून परत गेला असला तरी अवकाळी पावसाच सावट सुरू झालेला आहे. शेतकरी म्हणतात यंदा दिवाळी पावसाळी होणार का हे पावसाचं विघ्न आम्हाला सहन करावा लागणार का?.

हवामान खात्याने सांगितला आहे की, 19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम राहील कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी व्यवस्थित काळजी घ्यावी.

Leave a Comment