Weather update | काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना पावसाने चक्क हैराण करून सोडले आहे, आधी सप्टेंबर महिन्यात होतच नव्हतं केलं, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पळू का सळू केल आहे. राज्यातून पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, पण सध्या हवामान स्थिर होताना पाहिला दिसत आहे. परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार एक नोव्हेबर पासून राज्यात हवामान निवळेल परंतु नंतर राज्यात काही ठिकाणी हलक्या सरांची शक्यता आहे म्हणजे सुरुवात दमट आणि ढगाळ वातावरणात होणार आहे.
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेला दोन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मागील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता कोकण पुणे नाशिक आणि विदर्भात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेला आहे. पण हे चक्रीवादळाचा प्रवाह आता कमी झाल्याने पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळत आहे.
एक नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत राज्यात काय होईल?
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, या काळात बहुतांश भागात पावसाची उघड दीप राहणार आहे. परंतु काही ठिकाणी ढगाळ वातावरण सह हलक्या सरी पडू शकतात. दिवसभर उखडा आणि दमटपणा जाणवेल, तर सकाळच्या वेळी अधून मधून विजांचा कडकडाट होऊ शकतो.
मुंबई आणि कोकण या ठिकाणी 1 नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ते 30°c तर रात्री 35°c राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर दमट हवामान कायम राहील. पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान सुमारे 29 संस सेल्सिअस तर किमान 20 अंश सेल्सिअस राहील. दुपारच्या वेळी थोडं ऊन आणि सायंकाळी कारवा पाहायला मिळेल.
नाशिक धुळे जळगाव या भागात दिवसभर आकाश ढगाळ राहील सायंकाळी विजांचा कडकडाटात आणि हलका पाऊस होऊ शकतो. नाशिकचे तापमान दिवसाचं 30°c आणि रात्रीचा 17 अंशापर्यंत खाली येऊ शकतं. हवेत गारवा जानवेल पण दमटपणाही राहणार आहे.
मराठवाड्यात अजून दमट हवामान कायम आहे. आकाश ढगाला राहील आणि सायंकाळच्या सुमारास हलक्यातील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तापमान 29 23 अंशाच्या दरम्यान राहील विशेष म्हणजे शेतीसाठी हा थोडासा ब्रेक हवामान अनुकूल ठरू शकतो. तर विदर्भातील अमरावती अकोला नागपूर परिसरात सध्या दमटपणा आणि ढगापणा कायम आहे. दिवसभर गारवा आणि रात्रीच्या वेळी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. अमरावतीत तापमान 31 ते 21 अंश दरम्यान राहील, तर नागपूर मध्येही साधारण अशीच परिस्थिती असेल. .
