weather update today | मागच्या काही दिवसापासून पावसाने अनेक भागांमध्ये जोर वाढवला आहे. तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये मोठा इशारा दिला आहे, राज्यात थेट मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.weather update today
हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, त्यांच्या हवामान अंदाज मध्ये सांगितले होते की या महिन्यांमध्ये पाऊस कमी असणार आहे. परंतु सध्या परिस्थिती उलट झाली आहे या महिन्यांमध्ये सर्वात जास्त जोरदार पाऊस दिसून आला आहे. आता तर गणपती बाप्पा देखील आले आहेत व याचबरोबर पावसाने देखील जोर वाढवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
तर मुंबई मध्ये देखील पाऊस दिसून येणार आहे, देशात पावसाचा जोर वाढत असून छत्तीसगड, आंध्रप्रदेश, गोवा ,महाराष्ट्र ,ओडीसा ,या भागामध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यानंतर आसाम, मेघालय ,राजस्थान ,गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश ,कर्नाटक ,पंजाब ,तामिळनाडू या भागामध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी गावाचे चेतन निर्माण झालेले आहे राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय, तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे मराठवाडा, कोकण, विदर्भ, या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर या भागामध्ये विजेच्या गडगडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार पाऊस :
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार घाटमाथा ,पालघर ,कोकण, रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,जालना, परभणी, भंडारा, नांदेड ,गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर ,या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
यावर्षी गणेशोत्सवर पावसाचे आगमन बघायला मिळाले आहे उद्या आणि परवा राज्यामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे त्याचबरोबर नाशिक मध्ये पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण हे ९८ टक्के भरले असून जिल्ह्यातले 12 धरण हे शंभर टक्के भरले आहे . धरण पाणी लोट क्षेत्रात आठ दिवसापासून पाऊस सुरू असून गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Disclaimer : आम्ही दिलेली माहिती ही विविध वर्तमानपत्र, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली असते. तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा तुमच्या कोणत्याही नुकसानीच आम्ही जबाबदार राहणार नाही.