शंभर वर्षानंतर हा मोठा राजयोग तयार, या तीन राशींना होणार बक्कळ लाभ! आधी खूप भोगला आहे संकटाचा काळ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Zodiac Sign | ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीनंतर काही तीन राशींसाठी पुन्हा एकदा राजयोग तयार झालेला आहे. आणि हा राजयोग सोनेरी स्पर्श देणार आहे. शंभर वर्षानंतर असाच त्रिग्रह योग तयार होतोय जो तीन बलाढ्य ग्रहांच्या संगतीमध्ये जन्माला आलाय. सूर्य मंगल आणि शुक्र यांच्या एकत्र येण्याने. हा योग नोव्हेंबर महिन्यात वृचिक राशि तयार होणार असून, यावेळी तीन राशींचे नशीब अक्षरशः चमकणार आहे. काहींना पैसा मिळणार काहींना प्रतिष्ठा तर काहींना घरगुती आणि व्यवसायात प्रगती मिळणार. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी. Zodiac Sign

वृश्चिक राशी : आत्मविश्वास, मान-सन्मान आणि नवं यश या वेळेस त्रिग्रही योग थेट वृश्चिक राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. म्हणजेच हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि सामर्थ्यदायी ठरणार आहे. आतापर्यंत थकलेले प्रयत्न आता फळ देणार आहेत. आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल, समाजात मान-सन्मान मिळेल. ज्यांच्या नशिबात संघर्ष लिहिला होता त्यांना आता गडगंज श्रीमंतीची दारे खुली होतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील, एखादा नवा प्रोजेक्ट हातात येईल, घरात एखादं वाहन किंवा संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांसाठी शुभ प्रस्ताव येतील आणि नव्या नात्यांची सुरुवात होईल. एकूणच, जीवनाचा संघर्ष आता स्थिरतेकडे वाटचाल करणार आहे.

मकर राशी : उत्पन्नात झपाट्याने वाढ, जुनी देणी फिटणार मकर राशीसाठी हा त्रिग्रही योग थेट लाभस्थानात तयार होत असल्याने त्याचा थेट फायदा मिळणार आहे. काही काळापासून अडकलेली पैशांची आवक पुन्हा सुरू होईल. धनप्राप्तीचे अनेक नवे मार्ग खुलतील. काहींना अचानक एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळेल, तर काहींच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल होईल. गुंतवणुकीतून नफा, शेअर मार्केटमध्ये लाभ आणि अडकलेले व्यवहार अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल असून प्रमोशन किंवा पगारवाढीची शक्यता निर्माण होईल. घरात समाधान आणि स्थैर्य येईल. समाजात तुमचं मत आणि सल्ला ऐकला जाईल.

कर्क राशी : भाग्याची साथ, धार्मिक कार्य आणि शुभ प्रसंग या वेळेस त्रिग्रही योग कर्क राशीच्या नवव्या भावात निर्माण होत आहे. भाग्यस्थानात तयार होणारा योग हा जीवनात बदल घडवणारा मानला जातो. कर्क राशीच्या लोकांना या काळात देवाची पूर्ण कृपा लाभेल. घरात धार्मिक कार्य, हवन किंवा शुभ प्रसंग घडतील. ज्यांचं काही सरकारी काम अडकलं होतं, ते आता सहज पूर्ण होईल. प्रवासातून यश मिळेल, नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळेल, तर विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतील. व्यवसायात नवीन संपर्क आणि नवे मार्ग उघडतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल.

( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि अंधश्रद्धेला दुजारा देत नाही.)

हे पण वाचा | आजचं राशिभविष्य ! तुमच्या राशीसाठी येणाऱ्या २४ तासांत होणारं आश्चर्यकारक भविष्य काय आहे

Leave a Comment