पंजाब डक यांचा नवीन हवामान अंदाज : या तारखेला राज्यात होणारा अवकाळी पाऊस पंजाबराव यांनी दिली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck News | शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी मोठी माहिती दिली आहे. ( Punjab Duck News )

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. कधी थंडी कधी ऊन तर कधी अचानक अवकाळी पावसा गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. अशातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील विदर्भ विभागामध्ये अचानक आलेल्या पावसाने मध्यंतरी शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केले होते. शेतकऱ्यांची उभे पीक पूर्ण माती मोल झाले होते. पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर ओडिसा आणि परिसरावर चक्रकार वाऱ्यांचे स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच त्याहून पूर्व विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.

हे पण वाचा | शेती विषयक माहिती व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच मराठवाड्यापासून ते कर्नाटक आणि तमिळनाडू व कोमोरीन या भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा हवामान खात्याने अवकाळी पावसासाठी वातावरण तयार होत असल्याची माहिती दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली ा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच दुसरीकडे ज्येष्ठ हवामान तज्ञ ( Punjab Duck News ) पंजाबराव यांनी राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव डक हे ज्येष्ठ हवामान तज्ञ आहेत. मध्यंतरी यांनी दिलेला अंदाज हा पुरेपूर खरा ठरलेला आहे. त्यामुळे शेतकरी पंजाबराव डक अंदाजावर विश्वास ठेवतात व असेही म्हटले जाते पंजाबराव डक शेतकऱ्यांचे विश्वासू मित्र आहेत. अशातच पंजाबराव डक महत्त्वाची अपडेट दिली आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मार्चपासून महाराष्ट्र मध्ये अवकाळी पाऊस सुरू होणार आहे. व 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पंजाबराव यांनी दिलेला अंदाजानुसार विदर्भातील गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांचे शेत पिकांची विशेष काळजी घ्यावी अशी देखील नमूद केले आहे.

व तसेच उर्वरित महाराष्ट्र मध्ये कुठेही अवकाळी पाऊस किंवा गारपीट होणार नाही असे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र खानदेश व पुण्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकण आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे.

व राज्यामध्ये खास करून विदर्भावरती अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. हे सावट वीस तारखेपर्यंत राहील यानंतर हवामान कोरडे होणार आहे. आणि उन्हाचा पारा वाढणार आहे असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 21 मार्चपासून उन्हाचा पारा 40°c पेक्षा अधिक होणार आहे असा देखील पंजाबराव यांनी अंदाज वर्तवला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!