weather update today :- राज्यात धोक्याचा इशारा, महाराष्ट्र सह देशभरातील वातावरणात मोठ्या बदल होणार आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र बरोबरच ओडिषा मध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.weather update today
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 90% अनुदान अर्ज प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा
शेतकरी बांधवांसाठी धोक्याचा इशारा मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील पिकांचाही नुकसान होऊ शकते. ओडिसा सरकारनं २५ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केले आहे. काल अनेक राज्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे ज्यामध्ये जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या बर्फोष्टीमुळे श्रीनगर हायवे बंद आहे त्यामुळे अनेक गाड्या रांगेमध्ये उभा आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल अजमेर जयपुर जैसलमेर, राजस्थानचे अनेक भागांमध्ये तापमानात मोठ्या प्रकारचा बदल दिसून आला आहे त्यामध्ये दिवसाचे तापमान हे 30°c पर्यंत नोंदवले आहे तर गुरुवारी चित्तोडगड मध्ये सर्वाधिक तापमान 34.2°c इतका नोंदवला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
मागील 24 घंट्यामध्ये अनेक राज्यासह पंजाब राज्यामध्ये अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. अमृतसर मध्ये 76मिमी तर लुधियाना , पटियाला मध्ये 9मिमी इतका पाऊस झाला आहे. तरी हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जरी केला आहे व अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील काम लवकरात लवकर करून घ्यावे.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये? या तारखेला होणार खात्यामध्ये जमा
1 thought on “राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! वातावरणामध्ये होणार मोठे बदल”