एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कापसाला किती मिळणार बाजार भाव? तज्ञांनी दिली माहिती…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी पांढरा सोनं म्हणून ओळखला जाणारे कापूस हया पीका च्या बाजारभावात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील काही घटकामुळे आणि मार्च एंडिंग मुळे सध्या कापुस बाजार भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. बाजारभावाच्या या घडामोडीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

येणारे एप्रिल व मे महिन्यात कापसाला किती भाव मिळणार हा देखील शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित आहे. कापुस बाजार भाव वाढ होईल यापेक्षा ने खूप शेतकऱ्याने कापूस बाजारात आणला नव्हता मात्र कापसात कुठल्याही प्रकारची सुधारणा पहायला मिळाली नसल्यामुळे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. खरं पाहायचं झालं तर आता खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापसाचा माल शिल्लक आहे.

तरीदेखील जे शेतकरी बांधव कापसाची साठवणूक करू शकत होते, ज्या शेतकऱ्यांना पैशाची तात्काळ गरज नव्हती, अशा सर्व शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढतील या अपेक्षाने कापूस साठवून ठेवला आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात कापसाचे भाव कसे राहणार हा महत्त्वाचा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहे. याच संदर्भात तज्ञ लोकांनी मोठी माहिती दिली आहे.

चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालता जाणून घेऊ भविष्यात कापसाला किती भाव मिळणार? तज्ञाच्या माहितीनुसार गेल्या वर्षी विजयादशमीला कापसाचा नवीन हंगाम सुरू झाला होता. आता हा हंगाम जवळपास शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशातच बाजार तज्ञांनी येणाऱ्या दिवसात कापसाचा बाजार भाव कसा राहणार याबद्दल माहिती दिली आहे. तज्ञाच्या माहितीनुसार एप्रिल महिन्यानंतर कापसाचा बाजार भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

सोयाबीनची आवक व दर घसरले, पहा कुठे मिळतोय सोयाबीनला हमीभाव

Cotton Market News

सध्या बाजारभावाकडे पाहिलं तर कापसाच्या बाजार भाव चढउतार चालूच आहे. मात्र एप्रिल महिन्यात कापसाचे भावातील चढ-उतार स्थिर होऊन बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे. असे बाजार अभ्यासक यांनी म्हटले आहे. उद्योजक नेहमीच सीसीआय कडून कमी बाजार भाव कापसाचे मागणी करत असतात. यंदा मात्र सीसीआयने खूप मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे सीसीआय यावर्षी उद्योजकांना कमी दरात कापूस देणार नाही.

सीसीआयने बाजार भावापेक्षा सीसीआयच्या कापसाला चांगला भाव मिळत असल्याचे म्हटले आहे. यामुळे बाजार समिती मध्ये कापसाला येणाऱ्या काळात चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज आहे. एप्रिल महिन्यात कापसाचे बाजार भाव पुन्हा एकदा आठ हजार रुपयांच्या पार जातील असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे.

तज्ञाच्या मते जागतिक कापूस बाजार भाव अशी तुलना केली असता अजूनही भारतातील कापूस स्वस्त आहे. त्यामुळे भारतीय कापसाला मागणी वाढणार आहे. देशांतर्गत उद्योजकाकडून कापसाचे खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे उद्योजकाकडे यंदा मात्र कापसाचा पुरवठा खूप कमी प्रमाणात आहे. यामुळे कापसाला मागणी कायम राहणार आहे. परिणामी पांढरे सोने पुन्हा एकदा चांगलेच चमकेल असा अंदाज आहे.

एप्रिल महिन्यात कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळू शकतो आणि मे महिन्यात बाजारभावात आणखीन सहा ते सात टक्क्यांनी वाढ होऊ शकते. असा अंदाज कापुस बाजार तज्ञ यांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे घडले तर च्या शेतकऱ्यांकडे कापसाचा माल शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

शेती हवामान आणि बाजार भाव विषयी अशाच नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कापसाला किती मिळणार बाजार भाव? तज्ञांनी दिली माहिती…”

Leave a Comment

error: Content is protected !!