pm kisan yojana 19th installment :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी pm Kisan योजनेचा 19 वा हप्ता नुकताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे. तुमच्या खात्यावरती आला की नाही याप्रकारे तपासा. pm kisan yojana 19th installment
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार मधील भागलपूर येथे गेले असताना तेथून त्यांनी पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील तब्बल 9.8 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 22000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
हे पण वाचा :- 9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना 2019 ला सुरू करण्यात आली होती, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्ते प्राप्त झाले होते व आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व्या हप्ता रक्कम जमा करण्यात आली आहे. ती योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर (DBT) योजना बनली या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम दिली जाते.
तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही?
जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सर्वप्रथम pmKisan.gov.in या अधिकृत साईटला भेट द्या. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर बेनीफिशर टेटस असा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा. यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाका नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यासमोर कॅपचा कोड येईल तो भरल्यानंतर गेट डाटा असा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला आतापर्यंत किती आपले प्राप्त झाले याची संपूर्ण माहिती प्राप्त होईल.
Pm kisan योजनेची केवायसी ?
जर तुम्ही पीएम किसान योजनेची केवायसी केली नाही तर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घरी बसून करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करायचे आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर e KYC असा पर्याय दिसेल त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आता क्रमांक टाकल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी तो ओटीपी त्या ठिकाणी टाका ओटीपी टाकल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.
हे पण वाचा :- बहिणींना मोठा धक्का! तब्बल 40 लाख महिला होणार योजनेपासून अपात्र ?
2 thoughts on “तुम्हाला आले का 2,000 हजार रुपये! Pm Kisan योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा ”