Cotton Soybean Anudan: राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2023 मधील खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकावर अर्थसहाय्य देण्यासाठी सरकारने योजनेअंतर्गत प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यात आले आहे. कापूस सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे. मात्र अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना आणखीन कापूस व सोयाबीनचे अनुदान मिळालेले नाही.
हे पण वाचा | मोठी बातमी! प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या निधीमध्ये झाली वाढ आता घर बांधण्यासाठी मिळणार जास्त पैसे
अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र?
- यासाठी खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र आहेत.
- ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाते.
- खरीप 2023 कापूस सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व चंद्रपूर जिल्ह्यातील जेवली तालुक्यातील नॉन डिजिटलाइज्ड व्हिलेजेस मधील खरीप 2023 कापूस सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामायिक खातेधारक पात्र आहेत.
हे पण वाचा | संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर? त्वरित करा हे काम लगेच येतील खात्यात पैसे
पात्र शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी काय करावे?
- पात्र शेतकऱ्यांनी हे अनुदान मिळवण्यासाठी ई पीक पाहणी पोर्टल वरील यादीत आपले नाव आहे का नाही पहावे. किंवा संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडून करून घ्यावी.
- तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ईपीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही किंवा ज्यांच्या खरीप 2023 च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी कार्यालयात संपर्क साधावा.
- खरीप 2023 पासून सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेधारक यांनी तहसील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तब्बल 40 लाख लाभार्थी महिला या कारणामुळे होणार अपात्र?
आम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की अर्थसाह्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेधारकांना आपले आधार संमती व सामायिक खातेधारकांना आधार संमती सह ना हरकत प्रमाणपत्र दिनांक 28 2 2025 पर्यंत संबंधित कृषी सहाय्यक कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. हे काम तुम्ही केले नाही तर तुम्ही कापूस व सोयाबीन अनुदानापासून वंचित राहू शकतात. Cotton Soybean Anudan
आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना कृषी सहाय्यक कार्यालयाकडे उपलब्ध आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागात प्राप्त न झाल्यास लाभार्थी कापूस व सोयाबीन अर्थसहाय्यापासून वंचित राहणार आहे. याची सर्व लाभार्थ्यांनी दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागीय कार्यालयात किंवा जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.