विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या भागात तडाका; राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी देखील राज्यामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार धडक मानसूनी दिलेली याबाबत भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार 14 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. Maharashtra Weather Forecast

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तापमान कमाल 32°c आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर पुण्यामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

व शहराच्या काही भागांमध्ये तुला ठिकाणी पाऊस पडू शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क व रेनकोट छत्री घेऊनच घराबाहेर पडावे. पुण्यामध्ये तापमान कमल 35 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तसेच राज्यामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे. कोल्हापूर मधील चार-पाच दिवसापासून चांगला पावसाचा जोर दिसून येत आहे कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तर तापमान कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 37°c इतका असणार आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भामध्ये देखील पावसाची चांगली एन्ट्री मिळाली आहे. विदर्भामध्ये वादळे वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील अकोला धाराशिव अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील तीन दिवस हवामान विभागाने येलो अलर्ट जरी केला आहे.

मराठवाड्यात देखील चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु पावसासोबत वादळी वाऱ्याने देखील मोठे नुकसान केले ते दिसून आले आहे. तसेच येथे 48 तासांमध्ये भारतीय हवामान खात्याने बीड जालना छत्रपती संभाजी नगर धाराशिव परभणी या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच इथे तापमान कमाल 35°c आणि किमान 29 इतके असणार आहे. या भागातील नागरिकांनी या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी अशी देखील प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

(नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन हवामान अंदाज आयुष्य व शेती विषयक माहिती विषयी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळातल्या नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर मिळतील व हा लेख तुमच्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा त्यांना देखील या हवामानाविषयी माहिती मिळेल धन्यवाद…!)

1 thought on “विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या भागात तडाका; राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता”

Leave a Comment

error: Content is protected !!