Pm Kisan योजनेचे पैसे या तारखेनंतर मिळणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan | देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. आता लवकर शेतकऱ्यांना 21 वा दिला जाणार आहे याबाबत एक महत्त्वाची अपडेट प्रसार माध्यमांमध्ये दिलेली आहे. परंतु हा हप्ता कधी जमा होणार योजनेची संपूर्ण माहिती काय हा लेख त्यासाठी सविस्तर वाचा. Pm Kisan

शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप खरीच मोठी आहे, केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा आर्थिक मदत देत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना वीस हप्ते यशस्वीरित्या मिळालेल्या आहेत आणि या योजनेचा पुढचा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमांमधून एक या योजनेचा 21 वा हप्ता नेमका कधी मिळणार याची विचारणा होत होती. शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि यासंदर्भात अगदी कामाची माहिती समोर आलेली आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, काही राज्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला आहे. पंजाब उत्तराखड हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे झालेली अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी झालेली होती. पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतात काहीच उरले नव्हते. याच पार्श्वभूमी वरती दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत जमा करण्यात आली

महाराष्ट्रात देखील अशीच काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला नाही. महाराष्ट्रातील शेतकरी सातत्याने प्रश्न विचारत आहे बाकीच्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला पण आम्हाला कधी मिळणार.

राज्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होणार आहे आणि त्याची आचारसंहिता लागू झालेली आहे. तसेच बिहारमध्ये देखील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निधी हस्तांतरित करण्यासाठी शासनाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शासनाला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार आहेत.

शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सध्या बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील आता येऊ शकतो. आपण पाहिले तर 14 नोव्हेंबर नंतरच हप्ता मिळू शकतो कारण 14 नोव्हेंबर नंतर निकाल जाहीर होणार आहे. शेतकरी बांधवांना 14 नोव्हेंबर नंतरच हप्ता मिळू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना आणखी काही दिवस वाटवावी लागणार आहे.

एकंदरीतच सर्व मीडियाचा रिपोर्ट पाहता, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तिसरी किंवा चौथी आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काही दिवस आणखी वाट पहावी. शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्यात 20 वा हप्ता जमा झाला आहे परंतु आता 21 वा हप्ता सुद्धा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. परंतु बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा हप्ता जमा होईल.

हे पण वाचा | शेतकऱ्यांनो मुहूर्त ठरला! या तारखेला खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता?

Leave a Comment

error: Content is protected !!