Ladki Bahin Yojana: राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मागील वर्षाच्या जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण 13500 देण्यात आले आहेत. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम लाडकी बहिण योजने अंतर्गत केले जात आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी खटाखट पैसे जमा होऊ शकतात..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये नऊ हप्ते जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 12 मार्च 2025 रोजी जमा करण्यात आला आहे. यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा हप्ता 6 एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही.
दरम्यान या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण होत असल्याच्या चर्चा होत आहेत. राज्यात सुरू असलेल्या इतर योजनेचा पैसा या लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र ही योजना अशीच सुरू राहणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल होऊ शकतात मात्र ही योजना बंद होऊ शकत नाही असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | लाडक्या बहिणींची होणार सखोल चौकशी! अंगणवाडी सेविका घरी जाऊन करणार पडताळणी
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळाले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले मात्र आता 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळेल का नाही असा प्रश्न देखील पडत आहे.
याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे अजित पवार यांनी सांगितले होते. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी याबाबत कधी अंमलबजावणी होईल हे स्पष्ट सांगितले नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा