मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात शुल्क हटवला; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Export News: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील अनेक दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत होते. याशिवाय कांद्याच्या बाजारभावात देखील मोठी घसरण झाली होती. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क मागे घेण्याची अधिसूचना महसूल विभागाने आज जारी केली आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2025 पासून याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हे पण वाचा | महाराष्ट्रावर नवीन संकट! IMD कडून या 9 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा…

भारत सरकारने 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 पर्यंत सुमारे पाच महिन्यासाठी शुल्क निर्यात किंमत आणि निर्यात बंदी याद्वारे कांद्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी उपाय योजना केल्या होत्या. 20% निर्यात शुल्क लावण्यात आली होती मात्र ती आता काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे कांद्याची जास्त प्रमाणात निर्यात केली जाणार आहे. वाढत्या निर्यातीमुळे कांद्याची मागणी देखील वाढेल आणि त्याची किंमत देखील वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरत आहे.

रब्बी हंगाम्यातील कांद्याच्या चांगल्या आवकमुळे बाजारपेठा आणि किरकोळ बाजारातील किमती कमी झाल्या होत्या. संपूर्ण भारतामध्ये सरासरी किमतीमध्ये 39 टक्के घट झाली होती. गेल्या एक महिन्यात संपूर्ण भारतातील सरासरी किरकोळ किमतीमध्ये दहा टक्के घट झाली होती. आता केंद्र सरकारने एक एप्रिल 2025 पासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क कमी करण्यात आ निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Onion Export News

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! उपमुख्यमंत्री यांनी केले स्पष्ट लाडक्या बहिणींना 1500 की 2100 रुपये ? 

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय फायद्याचा निर्णय ठरू शकतो. मात्र निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारने खूप उशीर केला आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचा कांदा हा मागील काही कालावधीत अगदी कवडीमोल दरात विकला गेला आहे. आता राज्यात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याची आवक आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने आता कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे तरच शेतकऱ्यांना कांद्याला दरवाढ मिळेल.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात शुल्क हटवला; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..”

Leave a Comment