borewell anudan yojana maharashtra :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्येच आता राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, 2024 पंचवीस पासून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्ग बोरवेल घेण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना पाण्याची अडचण दूर होणार आहे, अनिल नाही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्व ठरणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?
राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असल्यामुळे आता सरकारने 100% अनुदान वर ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना शेततळे तयार करणे प्लास्टिक पणे पुरवठा सूक्ष्म सिंचन पद्धती पीव्हीसी पाईपुरवठा आणि जुनी विहिरीच्या दुरुस्तीसाठी अनुदान देण्यात येत होते परंतु यावर्षी नव्याने बोरवेलला देखील अनुदान देण्यात येणार आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत बोरवेल खोदण्यासाठी कोणती अनुदान नव्हते त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. परंतु आता या योजनेअंतर्गत बोरवेल खोदण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे आणि शेतीचे उत्पन्न देखील वाढ होणार आहे.
असा करा योजनेला अर्ज :-
या योजनेला अर्ध करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या योजनेला तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता.
अर्ज करण्यास पात्रता :-
- पात्र अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमातील प्रवर्गातील असला पाहिजे.
- अर्जदाराकडे शासनमान्य जातीचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
- सातबारा आणि आठ उतारा शेतकऱ्यांच्या नावावर असावा
- शेतकऱ्याकडे किमान 0.40 एकर शेत जमीन असले पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे :-
- लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड
- लाभार्थी जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती प्रतिज्ञापत्र
- आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- शेतीत आधी विहीर नाही याची अधिकृत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे
अशाच माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा