24K Gold Rate India | सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. लग्नसराई, गुंतवणूक, किंवा एक छोटीशी बँक समजून अनेक घरांमध्ये सोन्याला वेगळंच स्थान असतं. आज जर तुम्ही सोनं खरेदी करायचं ठरवलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सोन्याच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 24K Gold Rate India
हे पण वाचा | महिलांना मिळणार महिन्याला 7000 रुपये ! LIC ची खास नवीन योजना पहा संपूर्ण माहिती
दोन दिवसांपूर्वी म्हणजे 9 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल ₹600 ची घट झाली होती, तर 24 कॅरेटमध्ये ₹660 चं घसरण दिसून आली. हे दर कमी झाल्यानं सामान्य ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला होता. पण गुंतवणूकदार मात्र चिंतेत पडले होते.
मात्र त्यानंतरच्या दोन दिवसांत म्हणजे 10 आणि 11 जुलैला सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा वरचा ट्रेंड पकडला आहे. काल 22 कॅरेटमध्ये ₹200 आणि 24 कॅरेटमध्ये ₹220 इतकी वाढ झाली. विशेष म्हणजे आज 11 जुलै रोजी देखील ही वाढ कायम राहिलेली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांनी प्रत्येक शहरातील सध्याचा दर नीट बघूनच निर्णय घ्यावा.
हे पण वाचा | महिलांना मिळणार महिन्याला 7000 रुपये ! LIC ची खास नवीन योजना पहा संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (11 जुलै 2025):
📍 मुंबई / पुणे / नागपूर / ठाणे / कोल्हापूर / जळगाव
🔸 18 कॅरेट – ₹74,250 प्रति 10 ग्रॅम
🔸 22 कॅरेट – ₹90,750 प्रति 10 ग्रॅम
🔸 24 कॅरेट – ₹99,000 प्रति 10 ग्रॅम
📍 नाशिक / लातूर / वसई-विरार / भिवंडी
🔸 18 कॅरेट – ₹74,280 प्रति 10 ग्रॅम
🔸 22 कॅरेट – ₹90,780 प्रति 10 ग्रॅम
🔸 24 कॅरेट – ₹99,030 प्रति 10 ग्रॅम
यामध्ये थोडेफार फरक दिसत असले, तरी बहुतांश शहरांमध्ये सोनं आता नव्वदीच्या पार गेलं आहे. म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा दर सरासरी ₹99,000 पर्यंत पोहोचला आहे.
काय घ्यावं लक्षात?
सोन्याच्या किमती रोजच्या रोज बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत, इतर देशांतली मागणी या सर्व गोष्टी यामागे कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करणार असाल, तर प्रत्येक दिवशीचे अपडेट्स पाहणं गरजेचं आहे.
हे पण वाचा | महिलांना मिळणार महिन्याला 7000 रुपये ! LIC ची खास नवीन योजना पहा संपूर्ण माहिती
आज खरेदी करावी का थांबावं?
जर तुमचं उद्दिष्ट केवळ दागिने खरेदी करणं असेल आणि तुमच्याकडे त्यासाठी बजेट निश्चित असेल, तर किंमत फारशी खाली जाण्याची वाट पाहत बसणं योग्य नाही. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल, तर आणखी काही दिवस निरीक्षण करत वाट पाहणं फायदेशीर ठरू शकतं.
📌 Disclaimer:
या बातमीत दिलेली सोन्याच्या किमतीविषयीची माहिती विविध ऑनलाइन सोर्सेसवरून गोळा करण्यात आलेली आहे. प्रत्येक शहरातील किंमती स्थानिक ज्वेलर्सनुसार थोड्या फार प्रमाणात वेगळ्या असू शकतात. गुंतवणूक किंवा मोठी खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारात किंमतीची खात्री करावी. आम्ही या भावांबाबत कोणतीही आर्थिक जबाबदारी स्वीकारत नाही.