पावसाचा ब्रेक लागला! पुढील ४-५ दिवस महाराष्ट्रात काय घडणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today weather forecast Maharashtra | मे-जूनमध्ये राज्यात दमदार पावसानं हजेरी लावली. जुलैच्या सुरुवातीलाही जोरदार पुनरागमन पाहायला मिळालं. पण, आता १० जुलैनंतर हवामानात थोडा बदल जाणवतोय. पावसाची गती संथ झाली आहे. शेतकरी, शेतमजूर, वाहतुकीवर अवलंबून असलेला सामान्य माणूस आता प्रश्न विचारतोय  पुढे काय होणार? या हवामानात कोणती पेरणी करायची? रस्ते बंद होणार की मोकळे राहणार? आता हवामान खात्याच्या अंदाजावरच सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.Today weather forecast Maharashtra

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! नमो शेतकरी योजनेचे  पैसे या तारखेला होणार जमा? 

काल १४ जुलैला राज्यात कोकण-गोवा भागात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही आणि मराठवाड्यात तुरळक पावसाचं प्रमाण पाहायला मिळालं. नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  या कोकण पट्ट्यात पावसाने दमदार दर्शन दिलं. तसेच घाटमाथ्याच्या भागात  नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर  इथेही तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसल्या.

आज १५ जुलैचं हवामान  कुठं पडणार पाऊस?

आज मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. धुळे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग  या भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग, विशेषतः खरीप पिके टाकणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं ठरेल.

१६ जुलैचं विशेष  येलो अलर्ट!

१६ जुलै रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यासोबत जोरदार सरी कोसळतील. यामुळे नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळसारख्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | बिबट्याशी भिडला कामगार! लखीमपूरमध्ये जीवघेण्या झुंजीचा थरारक व्हिडीओ व्हायरल!”

पुणे आणि परिसर  ढगाळ वातावरणाची साथ

पुणेकरांसाठी हवामान विभागाने सांगितलं आहे की पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहील. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडण्याची शक्यता आहे. काल घाट भागात काही ठिकाणी दमदार सरी झाल्या, पण शहरात फारसं काही नव्हतं. त्यामुळे थोडी उसंत मिळाली असली तरी पूर्ण विश्रांती नाही.

मुंबईची स्थिती काय?

मुंबई, ठाणे, पालघर या भागात काल रात्री काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही या भागात ढगाळ वातावरण असून, हलक्या सरी अधूनमधून कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी छत्र्या, रेनकोट अजून बाजूला ठेवू नयेत. लोकलसेवा, वाहतूक यावर त्याचा परिणाम अल्प स्वरूपात दिसू शकतो.

टीप :–

वरील दिलेली माहिती ही हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिलेली असते. यामध्ये अनेक वेळा बदल होण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामान आणि परिस्थिती लक्षात ठेवून निर्णय घ्यावे. 

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment