शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! नमो शेतकरी योजनेचे  पैसे या तारखेला होणार जमा? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

namo shetkari yojana :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आजपासून  सहावा  लवकर त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत 99.26 लाख शेतकऱ्यांना हप्ता प्राप्त होणार असून यासाठी सरकारने 2169 कोटी रुपये मंजूर केले आहे. ही रक्कम या योजनेअंतर्गत असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट त्यांच्या आधार कार्ड डीबीटी बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. namo shetkari yojana

हे पण वाचा :- आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने  फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेमध्ये हे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना प्रतिवर्षे 6 हजार रुपये  दिले जात आहे. ती रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये दिले जातात प्रतीकी टप्पा 2000 रुपयांचा असतो. या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी 2023 24 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. 

आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये व राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांना आता वार्षिक 12,000 रुपये रक्कम दिली जाते. या योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला होता. 

हे पण वाचा :-  मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक 

या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले आहे, या योजनेचे माध्यमातून शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 8961 कोटी रुपये मिळाले आहे. डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधी पीएम किसन योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. 1938 ची रक्कम ही 1967.12 कोटी रुपये इतकी होती, तर आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 93.26 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment