Weather Alert | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे, परंतु पुन्हा एकदा हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशारानुसार, पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात परतीच्या पावसाने दार ठोठावल असून मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात जोरदार पावसाचा इशारा केलेला आहे. नाशिक, नगर, बीड, जालना, परभणी, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्ये आकाश पुन्हा एकदा ढगाळ होणार आहे. आणि या ठिकाणी वादळी पावसांसह विजांच्या कडकडाट शक्यता आहे. Weather Alert
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार सुरू झाली असेल तरी काही ठिकाणी अद्याप ओलसर वारे सक्रिय आहेत. त्यामुळे या भागात वातावरण पुन्हा एकदा ओलसर होत असून, तापमानात अचानक घट झाली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम असून, विजांच्या गडगटासह, फॉरेनचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून आलेला इशारा
हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, नगर, धुळे, पुणे, सातारा, बीड, लातूर, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय
हवामान खात्याने दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंता वाढलेली आहे. खरी भागामधील सोयाबीन, मका, कापूस या पिकांची हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे. असेच काही भागात शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तले जात. काही ठिकाणी पीक काढायला सुरुवात देखील झालेली नाही त्यामुळे शेतातच पिक वायला जात काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामान विभागाच्या अंदाजाकडे गांभीर्याने लक्ष घ्या.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पुढची 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा मोठा इशारा. शेतकऱ्यांनो सावध रहा!