Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा पैसा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हा हप्ता जमा झाला असून आता सर्व महिलांच्या नजरा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकडे लागल्या आहेत.लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडत आहे.
गेल्या काही दिवसापासून महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी, आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हाच प्रश्न महिलांच्या समोर उपस्थित होत आहे. दरम्यान सरकारने ऑक्टोबर महिना मिळण्या अगोदर महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे या सणानिमित्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला तर घर खर्च आणि सणाची खरेदी करण्यासाठी मोठी मदत होईल अशी महिलांची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारकडून ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्याचा आता कधी मिळणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिना अखेरपर्यंत किंवा दिवाळीनंतर जमा होऊ शकतो. गेल्या वर्षी भाऊबीज निमित्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करतील. दरम्यान मागील महिन्याचा अनुभव पाहता हा हप्ता मंजूर झाल्यानंतर चार ते पाच दिवसात महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होते.
ई–केवायसी बाबत सरकारचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेत पारदर्शकता निर्माण होवी व या योजनेचा गैरवापर न व्हावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अनेक महिलांनी या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत मात्र अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. काही ठिकाणी सर्वर डाऊन तर काही ठिकाणी आधार लिंक न झाल्यामुळे प्रक्रिया दमाने होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये महिलांनी नोव्हेंबर पर्यंत इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी आपली eKyc प्रक्रिया पूर्ण केली आहे. दररोज चार ते पाच लाख महिला आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. याशिवाय तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष टीम कार्यरत असून ग्रामपंचायत आणि महा ज्योती केंद्रावर सुविधा वाढवण्यात येत आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana
राज्यातील लाखो महिलांसाठी या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत आत्मविश्वासाचा आधार बनत आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळाल्यावर त्या घरात आर्थिक दिलासा मिळत आहे. काही महिला या पैशातून आपला घर खर्च भागवत आहे तर काही महिला आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहेत. तर काही महिलांनी या योजनेच्या पैशापासून आपला छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. अशावेळी दिवाळीपूर्वी जर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला तर महिलांना सण साजरा करण्यासाठी अधिक आनंद आणि उत्सुकता मिळेल. सरकारकडून देखील सकारात्मक प्रयत्न सुरू असून प्रशासन या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
1 thought on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी रुपये मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? eKYC बाबत सरकारचा मोठा निर्णय”