Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या भाऊबीजेला ओवाळणी मिळू शकते का?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नसून त्यांना आर्थिक दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभातून अनेक महिला आपला घर खर्च भागवत आहेत. या योजनेमुळे अनेक महिला स्ववलंबी झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता महिलांचा खर्च भागवण्यासाठी मोठा हातभार लावत आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार असा प्रश्न सर्वत्र ऐकायला येत आहे.

दिवाळीनिमित्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार का?

लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार का असा प्रश्न पडला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला आहे. त्यामुळे अनेकांना असं वाटत आहे की ऑक्टोबर चा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो. तर अनेकांना असेही वाटत आहे की, सरकार दिवाळीनिमित्त महिलांना याच महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील देऊ शकते. महिलांच्या म्हणण्यानुसार दिवाळीची खरेदी करायचे आहे भाऊबीजेची तयारी करायचे आहे अशा वेळी जर हप्ता मिळाला तर आर्थिक आधार मिळेल.

गेल्या काही महिन्यापासून सरकारने अनेक वेळा स्तनासुदीचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा केली आहे. त्यामुळे यंदाही भाऊबीजेचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार या आठवड्याच्या शेवटपर्यंत मोठा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे भाऊबीजीची ओवाळणी थेट लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा देखील होऊ शकते. यासाठी महिलांनी सरकारच्या अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी रुपये मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? eKYC बाबत सरकारचा मोठा निर्णय

e–KYC केल्याशिवाय आता मिळणार नाही?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी सरकारने ई केवायसी कारणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच ज्या महिलांनी ई–केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे फक्त त्यांनाच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहक सेवा केंद्रावर महिलांच्या रांगा दिसत आहेत. त्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे ई केवायसी प्रक्रिया करणे अधिक अवघड जात आहे. तरीसुद्धा महिलांनी संयम ठेवून ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा या योजनेचा लाभ मिळणे बंद होईल.

eKYC कशी करावी?

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • त्या ठिकाणी पहिल्याच पानावर ekyc बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकून सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत आहे का नाही ये तपासले जाईल.
  • त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून ओटीपी मिळवा.
  • पुढे तुमचा जात प्रवर्ग निवडा आणि खालील अटी मान्य करा.
  • शेवटी चेक बॉक्स वरती करून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • eKYC पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई–केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल.

भाऊबीजेला ओवाळणी मिळेल का?

राज्यातील लाखो महिलांना एकच प्रश्न पडला आहे या भाऊबीजेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ओवाळणी मिळेल का? सरकारकडून अजून याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे अनिश्चितता वर्तवली जात आहे. मात्र राज्यातील लाभार्थी महिला दिवाळीपूर्वीच या योजनेचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा बाळगून बसल्या आहेत. भाऊबीज निमित्त भावाकडून मिळणाऱ्या ओवळणी प्रमाणे सरकारकडून मिळणारी ही रक्कम खूप महत्त्वाची आहे. जर सरकारने भाऊबीज निमित्त महिलांना हा हप्ता दिला तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. Majhi Ladki Bahin Yojana

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment