राज्यातील या 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नुकसान भरपाई जमा होणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmers News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरणार आहे. कारण काही महिन्यापूर्वी पडलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. आज राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचा निधी जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा केली जात आहे. यासाठी एकूण 1356 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून वितरित करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल.

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पीकच नव्हे तर अक्षरशा जमीन देखील वाहून गेली, काही जणांचे जनावरे वाहून गेले तर काहीजणांची राहते घर देखील होऊन गेली. अशा बिकट परिस्थितीत राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आश्वासन दिले होते. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे बीड, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, सांगली, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला अशा तब्बल 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांनी दिवस-रात्र परिश्रम करून मेहनतीने उभं केलेले सोयाबीन, कापूस, मका, भात, मूग, उडीद अशा पिकांचे अतिवृष्टीमुळे व पुरामुळे हे पीक पूर्णपणे वाहून गेली. काही ठिकाणी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी पावसामुळे रोगराईने पिकावर हल्ला बोलला. निसर्गाने दिलेला हा मोठा आघात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करून गेला. अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रब्बी हंगामातील पीक उभं करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून नुकसान भरपाई देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. Maharashtra Farmers News

राज्य सरकारच्या अहवालानुसार सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे तब्बल 52 लाख हेक्टर क्षेत्रामधील पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिन झाले कर्जाचा बोजा वाढला पुढच्या हंगामाचे चिंता आणि सणासुदीच्या खर्चांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. आशाताच राज्य सरकारकडून नुकसान भरपाई च्या रूपाने मिळणारा हा निधी अनेक शेतकऱ्यांसाठी नवीन जीवदान ठरणार आहे. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

21 लाख शेतकऱ्यांना 1356 कोटी रुपये मिळणार

आज पासून या निधीचे वितरण सुरू होणारा असून राज्यातील सुमारे 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 1356 कोटी रुपयाचा निधी जमा केला जाणार आहे. ही मदत कोणाच्याही मध्यस्थशिवाय थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणारा असल्याने यामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारने दिलेल्या या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान भरून निघत नसलं तरी पुढील हंगामासाठी आर्थिक मदत नक्कीच होईल.

शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेती पिकाचे पूर्णपणे नाश झाला आहे. पाणी इतका आलं होतं की शेततळे नाही राहिलं आता सरकारकडून मिळणारी मदत नक्कीच चांगली गोष्ट आहे पण जर ही मदत थोडी जास्त मिळाले असती तर रब्बी हंगामाची तयारी करण्यास मदत मिळाली असती. अनेक शेतकऱ्यांचे हेच मत आहे की नुकसान भरपाई मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे मात्र वेळेत मदत मिळाली तरच त्याचा उपयोग होतो. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसावर आला आहे अशावेळी सरकारकडून मिळणारा निधी शेतकऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट ठरणार आहे. या पैशातून अनेक शेतकरी दिवाळीची खरेदी करतील, रब्बी हंगामासाठी खत बी बियाणे खरेदी करू शकतील.

शेतकऱ्यांचे आयुष्य हे नेहमीच निसर्गावर अवलंबून असतं. निसर्गाने साथ दिली तर शेतकरी त्यांच्या शेतीत भरघोस उत्पन्न घेऊ शकतात. शेतकऱ्यांना एवढ्या सर्व समस्यांचे समाधान करून पुन्हा एकदा मातीत आपलं बी पेरावे लागत आहे. आज मिळणारे नुकसान भरपाई ही फक्त आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आशाची किरण आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुक करण्यासारखा आहे. मात्र पुढील काळात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आधुनिक सिंचन सुविधा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण सोयाबीन पाण्याखाली जाऊन देखील सध्या जे निघत आहे त्याला देखील दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हातबल झाले आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment