Punjabrao Duck’s new weather forecast : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी राज्यातील हवामानाबाबत नुकतच भाष्य केला आहे. 2023 या कालावधीमध्ये राज्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस बरसला. यामुळे राज्यातील काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आणि शेतकऱ्यांची शेतपीकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली अशा परिस्थितीमध्ये 2024 या काळात मान्सून कसा राहणार याबाबत पंजाब डक यांनी हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
खरंतर 2023 या कालावधीमध्ये म्हणजे गेल्या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही. राज्यसह देशामध्ये मान्सून खूप उशिराने आणि सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता आली नाही. तसेच मान्सूनही पुरेपूर झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळले आहे. काही भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिण्याचा पाण्याचा आणि जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु यंदा मान्सूनचा आगमन केव्हा होणार हा प्रश्न शेतकरी बांधवांमधून नेहमी उपस्थित होत होता.
तुम्हाला तर माहीतच आहे मान्सून अजून महिन्यामध्ये सुरू होतो. त्यामुळे अजून मान्सूनला सुरुवात होण्यामध्ये बराच काळ बाकी आहे. परंतु याच बाबत ज्येष्ठ हवामान पंजाब डक यांनी 2024 मध्ये कसा पाऊस पडणार व आगमन कधी होणार व शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी याबाबत आपल्या नवीन हवामान अंदाज मध्ये माहिती दिली आहे. हाच अंदाज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
पंजाब डक यांचा हवामान अंदाज
पंजाबराव एक हवामान अभ्यासक आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये 2024 मध्ये मान्सून कसा राहणार हे सांगितले आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे 2024 मध्ये मान्सून काळात समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. व यावेळी पंजाबराव यांनी गेलेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मान्सून 22 दिवस पुढे सरकला असल्याचे देखील सांगितले आहे.
म्हणजे जो आपल्याकडे मान्सून दाखल होत असतो तो. आता 27 ते 28 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दाखल होणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये खरीप हंगामातील पेरणी देखील पूर्ण होत असतात.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा देखील मान्सून याच कालावधीमध्ये राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच त्यांनी या कार्यक्रमांमध्ये ज्या वर्षी सात जूनला मिरग नक्षत्र येत असतो तेव्हाच मान्सून काळात चांगला पाऊस पडतो अशी देखील त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांनी या कार्यक्रमांमध्ये अशी देखील सांगितले की यंदा देखील 2024 मध्ये सात जूनला मिरग तयार होणार आहे. त्यामुळे यावर्षी समाधानकारक असा पाऊस पडणार आहे. एवढेच नाही तर दहा जुलै ते 15 जुलै मध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे जर समजा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही तर त्यांनी जुलै महिन्यामध्ये पेरणी करावा व त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरणी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसे यावर्षी जून ते सप्टेंबर 2024 या काळात चांगला पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आता हा अंदाज खरा ठरतो का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. परंतु मागच्या अंदाजा विचार जर केला तर पंजाब डक यांनी अचूक अंदाज दिला आहे. त्यामुळे पंजाबराव यांच्या हवामान अंदाज कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहते.