SBI Scholarship : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. दिवाळीचा मोठा सण आणि यातच विद्यार्थ्यांसाठी एसबीआयकडून राबवण्यात आलेली ही योजना खरंच महत्त्वाची ठरणार आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) म्हणजेच देशातील सर्वात मोठी बँक आता गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी थेट मदत करणार आहे. बँकेच्या एसबीआय फाउंडेशन या शाखेतर्फे प्लँटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2025 जाहीर करण्यात आली असून, 9 वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेतून दरवर्षी ₹15000 रुपयापासून तब्बल वीस लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. SBI Scholarship
ही शिष्यवृत्ती म्हणजे फक्त काही आकडे नाहीत, तर अशा हजारो मुलांचे स्वप्न आहे जे अभ्यासात हुशार आहेत. पण घराची आर्थिक परिस्थिती आडवी येते. स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर केल आहे की यावर्षी एकूण 23,230 विद्यार्थ्यांना या योजनेतून फायदा होणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात कुठे ना कुठे एखादा विद्यार्थी या शिष्यवृत्तीमुळे पुन्हा शिकण्याच स्वप्न जगणार आहे.
कशी मिळेल ही शिष्यवृत्ती :
ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात 75 टक्के गुण मिळवले आहेत ज्यांचं घरचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादित आहे, ते पात्र ठरणार आहेत. यासाठी अर्ज sbishascholarship.co.in या वेबसाईटवर 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येईल.
9 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांसाठी :
या गटातील विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹15,000 दिले जातील. पण अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि घराचा वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंत असावं.
अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी:
देशातील टॉप 300 कॉलेज किंवा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹75,000 रुपये मिळतील. उत्पन्न मर्यादा सहा लाखापर्यंत, आणि गुण किमान 75% किंवा 7 CCPA असायला हवेत.
पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी :
अशा विद्यार्थ्यांना 2.5 लाख रुपये मदत मिळेल. ही शिष्यवृत्ती विशेष: उच्च शिक्षणासाठी झटणाऱ्यांना आधार देईल.
मेडिकल विद्यार्थ्यांसाठी:
AIIMS सारख्या टॉप संस्थेत शिकणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांना 4.5 लाख रुपये मिळतील.
IIT आणि IIM विद्यार्थ्यांसाठी :
IIT मधील विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये, तर IIM मधील MBA/PGDM विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये दिले जातील.
विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ गिफ्ट :
जे विद्यार्थी SC/ ST वर्गातील आहेत आणि जगातील टॉप ₹200 विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना SBI 20 लाख रुपये पर्यंतची कॉलरशिप देणार आहे. म्हणजे विदेशात शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
आरक्षणाच संतुलनही : 50% शिष्यवृत्ती महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, तर उर्वरित 50% SC – ST विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे मुलांनाही आणि समाजातील वंचित घटकांनाही शिक्षणात पुढे जाण्याची मोठी संधी मिळणार आहे.
SBI च्या या निर्णयामुळे आता गावागावातील गरीब घरातील विद्यार्थ्यांना IIT, IIM किंवा मेडिकल कॉलेजमध्ये शिकण्याचा स्वप्न साकार करता येईल. अनेक पालक म्हणतात अहो शिक्षणाचं वजन हलकं झालं आता, मुलगा मन लावून शिकणार. सरकार आणि बँक अनेकदा योजना आणतात, पण शिष्यवृत्ती खरंच भावनिक स्पर्श करणारी आहे, करण इथे फक्त आकड्यांचा नाही तर भविष्याचा प्रश्न असतो. यामुळे एसबीआयच्या या उपक्रमामुळे गरीब कुटुंबातील लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
हे पण वाचा | या योजनेअंतर्गत मिळणार 10 लाख रुपये! अर्ज प्रक्रिया काय