Gold News Bhav | सध्या सर्वत्र सणासुदीचा महोत्सव सुरू आहे आणि अनेक ठिकाणी दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटा साजरा केला जात आहे. अशातच बाजारातून एक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि सोने खरेदी दारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सोने चांदी घेण्याचा विचार करत असाल तर आज बाजारात मोठा बदल झालेला आहे. आज चांदीचा भाव आभाळला भिडलेला होता तो आता जमिनीवर कोसळलेला आहे. दिवाळीच्या उंबरठ्यावर सोन्याचे दर वाढले असतानाच ही बातमी सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण नागपूर सराफ बाजारात गेल्या काही दिवसात चांदी तब्बल 26 हजार रुपयांनी घसरली बुधवारी एकाच दिवसात 11 हजार रुपयांनी खाली आली आहे. Gold News Bhav
15 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव एक लाख 89 हजार रुपये प्रति किलो होता, पण आता 22 ऑक्टोबर पर्यंत तो एक लाख 63 हजारांवर आला आहे. अवघ्या आठ दिवसात तेवढी मोठी पडझड पाहून लोक आनंदी झालेले आहेत. परंतु गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि सराफ दुकानात दिवाळी पूर्वी ग्राहकांची गर्दी कमी झाली होती, कारण भाऊ अजून खाली येतील अशी चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर सोन्यामध्ये देखील घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन 21 ऑक्टोबरला एक लाख बत्तीस हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति दहा ग्रॅम जीएसटी सह इतकं होतं, दुसऱ्या दिवशी 22 तारखेला थेट एक लाख 25 हजार 763 रुपयांवर आला आहे. म्हणजे केवळ 24 तासांमध्ये साडेसहा हजार रुपये घसरण! सोने विकायच ठरवणाऱ्यांनी थांबले, तर विकत घ्यायचे म्हणणाऱ्यांनी अजून थांबून पाहत आहे अजून कमी होईल का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
तज्ञ सांगतात की घसरण काहीच योगायोग नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे, जागतिक बाजारात मागणी कमी झाली आहे आणि गुंतवणूकदारांचा ओघ शेअर बाजाराकडे वाढलाय. या सगळ्यांचा फटका थेट सोन्या बाजारामध्ये बसलाय. काही सोनार म्हणतात मागच्या वर्षी याच काळा सोन्या-चांदीच्या दुकानात तुफान गर्दी व्हायचे पण या वर्षी ग्राहक मोजकेच दिसत आहे.
जर तुम्ही देखील या काळामध्ये सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे त्यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे गुंतवणूक करा.
हे पण वाचा | सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर
