Aadhaar Card New Rules | देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तरी बातमी नक्की वाचा, कारण आता आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनला आहे. कुठे खात उघडायचं तर कुठे शिष्यवृत्ती घ्यायची असेल किंवा कुठे शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो सगळीकडे आधार कार्डची गरज भासते. पण जर तुम्हाला हे नियम माहित नसले तर तुम्हाला त्या संकटाला समोर जाऊन लागू शकते. कारण आता अपडेट करताना आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे आणि काही सेवांमध्ये नवीन बदल झाले आहेत. Aadhaar Card New Rules
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने एक ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू केले आहेत. आधी नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये शुल्क होतं, पण आता हे वाढवून थेट 75 रुपये करण्यात आल आहे. त्याचप्रमाणे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट, फोटो आणि डोळ्यांची स्कॅनिंग माहिती अपडेट करण्यासाठी FEE शंभर रुपये आणि 125 रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे आता जर कोणाला आधार वरचा फोटो किंवा अंगठ्याचा ठसा अपडेट करायचा असेल तर त्याला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
पण सरकारने काही वया गटातील मुलांना मात्र दिलासा दिलेला आहे. सात ते पंधरा वया गटातील मुलांसाठी आधारवरील बायोमेट्रिक अपडेट 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मोफत करण्यात आलेले आहे. तसेच या वया गटातील फिंगरप्रिंट किंवा आयरिस अपडेट मोफत करता येणार आहे. तसंच 5 ते 7 आणि पंधरा वर्षावरील मुलांनाही एकदा मोफत अपडेटची संधी दिली जाणार आहे. ऑनलाइन डॉक्युमेंट अपडेट ही 26 जून 2026 पर्यंत फ्री आहे, मात्र आधार केंद्रावर जाऊन करायचा असेल तर 75 रुपये शुल्क आकारले जाईल.
परंतु आता आधार enrollment ची फी मात्र वेगळी आहे पहिल्या व्यक्तीसाठी 700 रुपये आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी 350 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजे एखादा कुटुंब आधारच नव enrollment करणार असेल तर त्याला हे शुल्क वेगळं भरावे लागणार आहे.
याशिवाय काही नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. यामध्ये आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) साठी आता कडक नियम लागू होतील. बँकांमार्फत होणाऱ्या व्यवहारांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी RBI ने हे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक टच पॉइंटवर जोखीम व्यवस्थापन प्रणाली लागू केली जाईल.
UIDAI आणि नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया (NPCI) त्यांनी एकत्र देऊन नवीन इ केवायसी सिस्टम सुरू केलेला आहे. यामध्ये बँक किंवा NBFC ग्राहकांचा पूर्ण आधार नंबर न पाहता फक्त मास्क आयडी वापरून त्याची ओळख पटू शकतात. म्हणजे आता व्यवहार अधिक सुरक्षित पद्धतशीर होणार आहे.
हे पण वाचा | १ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..
