१ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card New Rule: नवीन आधार नोंदणी तसेच दहा वर्षापेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड क्रमांक चे अपडेट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार यंत्राचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व 36 जिल्ह्यांसाठी 2911 आधार यंत्र देण्याचे ठरवले आहे. त्यात सर्वाधिक 203 यंत्रे पुणे जिल्ह्यातील आधार केंद्रांना मिळणार आहेत. येत्या आठवड्याभरात ही यंत्रे सर्वत्र मिळणारा असून, राज्यासाठी आणखी सुमारे एक हजार दोनशे यंत्राची मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात 2014 पासून एकूण 3873 आधारित यंत्रे देण्यात आले आहेत. मात्र त्यातील 2558 यंत्रांच चालू असून, उर्वरित १३१५ यंत्र खराब झाले असून दुरुस्तीसाठी असल्याने नवीन आधार तसेच जुने आधार क्रमांक चे अपडेट रखडले आहे. त्यामुळे नवीन यंत्रे देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे मोठ्या प्रमाणात केली जात होती. राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन नव्या 4,166 यंत्राची पूर्तता करावी असे आदेश दिले आहेत.

हे पण वाचा :- FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल

त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2911 यंत्रे सर्व 36 जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत. येत्या आठवड्याभरात हे सर्व यंत्र संबंधित जिल्ह्यामध्ये पोहोच केली जाणार आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे यंत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक कार्यपद्धती निश्चित करण्याचे सांगितले आहे. त्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी, जिल्हा प्रकल्प प्रबोधक आणि जिल्हा आयटी समन्वय यांना काम सोपवण्यात आले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचा आहे व त्याला वेळोवेळी अपडेट देखील करणे आवश्यक आहे. मात्र आधार केंद्रावरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक जणांचे आधार कार्ड अपडेट होण्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे सरकारने हा नवीन निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- 1 मार्चपासून या नियमांमध्ये होणार मोठे बदल!  सर्वसामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम 

जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतरही यंत्र देण्यासाठी एका परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. उत्तीर्ण उमेदवारास प्रशिक्षण देऊन त्याच्याकडे हे यंत्र सोपवण्यात येणार आहे. त्यानंतरच या यंत्राच्या माध्यमातून नवीन आधार तसेच आधार अपडेट करणे होणार आहे. तोपर्यंत जुने यंत्रावरच कामकाज करावे लागणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Aadhar Card New Rule

कोणत्या जिल्ह्यात किती आधार यंत्र दिली जाणार याची आकडेवारी पाहूया.

अहिल्यानगर 77, अकोला 75, छत्रपती संभाजीनगर 75, अमरावती 104, बीड 77, चंद्रपूर 81, धुळे 44, गडचिरोली 40, गोंदिया 41, हिंगोली 60, जळगाव 113, जालना 60, कोल्हापूर 83, लातूर 59, मुंबई शहर 64, मुंबई उपनगर 132, नागपूर 60, नांदेड 125, नंदुरबार 49, नाशिक 121, धाराशिव 68, पालघर 86, परभणी 71, पुणे 203, रायगड 71, रत्नागिरी 53, सांगली 75, सातारा 79, सिंधुदुर्ग 38, सोलापूर 131, ठाणे 184, वर्धा 30, वाशिम 55, यवतमाळ 117 एकूण 2911.

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा