Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात यंदा मान्सूनला निरोप देऊन जवळपास महिना पूर्ण झाला आहे. पण तरीही आभाळाने अजून निरोप घेतला नाही काही दिवसापासून हवेत पुन्हा दमट वातावरण तयार होत आहे. वाऱ्याचा वेग बदलला आहे आणि आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 ते 19 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागांमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे काही भागांमध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि कोकणात आधीच पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. छत्रपती संभाजीनगर बीड जालना नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये आधीच मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे येथील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवगड बंदरात अनेक बोटी आश्रयाला थांबल्या आहेत.
या दिवशी या जिल्ह्यात होणार पाऊस
- 26 ऑक्टोबर— मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सातारा जळगाव नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- 27 ऑक्टोबर— याच जिल्ह्यांसह धुळे आणि नंदुरबार मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- 28 ऑक्टोबर— पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी आणि नांदेड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या काळात वादळी वारा विजेच्या कडकडाट आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. अति आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. Maharashtra Rain Alert
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 27 ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळात परिवर्तन होऊ शकते. हे वादळ ओडीसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकणार असले तरी त्याचा अप्रत्यक्ष पद्धतीने महाराष्ट्रात प्रभाव जाणवत आहे. दरम्यान अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. अनेक ठिकाणी भात आणि खरीप पिकाची कापणी सुरू आहे परंतु सततच्या पावसामुळे शेतमाल भिजून नुकसान होत आहे. नांदेड आणि लातूर भागात भाताच्या पिकावर बुरशीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हवामान तज्ञ यांच्या म्हणण्यानुसार, या हवामान बदलामागे समुद्र पृष्ठभागाच वाढतं तापमान मुख्य कारण आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होऊ लागेल. मात्र तोपर्यंत नागरिकांनी विजेच्या कडकडाटाच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे. शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा व आपल्या परिवाराची व स्वतःची काळजी घ्यावी. मान्सून परतला असला तरी निसर्ग अजून जोक देण्याच्या मूडमध्ये नाही. आभाळ पुन्हा एकदा दाटून येत आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनेचे लक्ष देऊन पालन करावे.
