Maharashtra Highway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा महामार्ग होणार आहे. हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे पुणे ते बेंगळूर असा विकसित होणार असून यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासात अगदी वेगाने आणि सुरक्षित होणार आहे. याची सर्व काम आता राष्ट्रीय (NHAI) महामार्ग प्राधिकरण तर्फे केले जाणार आहे. Maharashtra Highway
आपण पाहत आहोत की महाराष्ट्र मध्ये दिवसेंदिवस रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या नव्या आठ पदरी महामार्गाच्या बांधकामाला 2026 मध्ये सुरुवात होणार आहे. आणि फक्त दोन वर्षातच काम पूर्ण होईल असं लक्ष ठेवण्यात आलेले आहे. यामुळे या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे काम भारतामाल परी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण दोन शहरांचा मोठा विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं माहिती समोर आलेले आहे. हा आधुनिक महामार्ग भारतमाल योजनेअंतर्गत विकसित होणार आहे. या नव्या आधुनिक प्रकल्पामुळे पुणे बेरोज प्रवासाचे अंतर कमी होणार आहे आणि जलद होणार आहे.
सध्या पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 सुमारे 856 किलोमीटर लांबीचा आहे. पण नवा महामार्ग ८४५ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. जवळपास 100 किलोमीटरचा फरक पडणार आहे आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधून तसे कर्नाटक मधील बेळगाव बागलकोट दावणगिरी आणि चित्रदुर्ग या चार अशा 59 जिल्ह्यांमधून हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विकासाला देखील चालना मिळणार आहे आणि दैनंदिन दळणवळण मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी ! महाराष्ट्राला आणखी एक मोठा महामार्ग होणार, कुठून ते कुठपर्यंत असणार महामार्ग
