हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा! राज्यात या तारखेपर्यंत होणार मुसळधार पाऊस?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj: राज्याच्या हवामानाबाबत पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आलेले आहे, भारतीय हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी अपडेट दिलेली आहे. मान्सूनचा पाऊस परतला असला तरी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस धमाकूळ घालत आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यापासून पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केलेले आहे तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. Havaman Andaj

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर पुन्हा एकदा ही बातमी शेतकऱ्यांना चिंता वाढवणारी ठरणार आहे. महाराष्ट्रातील वादळी पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे वृत्त हवामान खात्याने दिले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोथा नावाचे चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबलेला आहे अशी माहिती हवामान तज्ञांनी दिलेली आहे. महाराष्ट्रावरती पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले असून यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडलेले आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, वादळी प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमनकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास रेंगळलेला आहे. हेच कारण आहे की राज्यातील वादळी पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस लांबलेला दिसतोय.

भारतीय हवामान खात्याने राज्यामध्ये पाच नोव्हेंबर 2025 पर्यंत मुसळधार पावसासोबत वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर हवामान खात्याने कोणता महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार पाच नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पुढील एक आठवडा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आवश्यक काळजी घ्यावी.

राज्यातील वातावरण कसं असणार?

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रा मुळे एक मोठा चक्रीवादळ तयार झालेला आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवरती पाहायला मिळत आहे यामुळे राज्यात पावसाचा प्रवास लांबला असेल पुढील पाच नोव्हेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा मोथा या चक्रीवादळात रूपांतर झाला असून 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र गुजरात किनारपट्टीच्या आसपास स्थिरावलेला आहे त्यामुळे हवामान खात्यातील तज्ञांकडून अंदाज देण्यात आला आहे. पण हा कमी दाबाचा पट्टा दोन-तीन दिवसात पुढे सरकणार आहे.

त्यामुळे तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये गुजरात मार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये हलक्या त्या मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात याचा अधिक प्रभाव पाहायला मिळेल असं तज्ञांनी क्लिअर केला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी देखील या हवामान अंदाज आकडे विशेष लक्ष द्यायच आहे.

हे पण वाचा | आता राज्यात इतके दिवस अवकाळी पाऊस पडणार? पंजाब रावांचा नवीन अंदाज

Leave a Comment