Kapus Bajar Bhav: शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी! कापूस खरेदीला सुरुवात; या ठिकाणी मिळतोय सर्वात जास्त दर, वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Bajar Bhav: राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम खूपच कठीण राहिला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन देखील दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदी हमीभावाने सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात काही केंद्रावर हमीभावाने खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. निसर्गासोबत लढा देऊन हमीभावाने कापूस खरेदी केला जात असल्याचे पाहून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.

विदर्भामधील अकोला जिल्ह्यातील चिखलगाव कापूस खरेदी केंद्रांतर्गत या हंगामाचा अधिकृत शुभारंभ झाला आहे. या ठिकाणी पहिल्याच दिवशी 15 क्विंटल पेक्षा जास्त कापूस खरेदी करण्यात आला आहे. मोझरचे शेतकरी सचिन शंकर पोटखडे यांनी सर्वप्रथम कापूस विकून या हंगामातील पहिल्या व्यवहाराचा मान पटकावला आहे. कष्टाचे पाणी करून उभा उभा केलेले पीक बाजारात नेल्यानंतर त्याला हमीभाव मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरत आहे. यावर्षी कापसाला 7710 ते 8110 प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आलेला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दारवा केंद्रावर पहिल्याच दिवशी तब्बल 100 क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. तर छत्रपती संभाजी नगर विभागातील जळगावच्या एरंडोल केंद्रावर देखील कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी 15 क्विंटल कापूस खरेदी झाला असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला आहे. CCI उपमहा व्यवस्थापक ब्रिजेस कसाना यांनी राज्यातील खरेदी सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जेच्या कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. Kapus Bajar Bhav

राज्यात एकूण 167 खरेदी केंद्र पैकी 89 खरेदी केंद्र विदर्भात आहेत तर उर्वरित 78 केंद्र मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागात सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टी गुलाबी बोंड आळी कीडरोग आणि किमान उत्पन्न घट झालेल्या परिस्थितीत एवढी केंद्र उपलब्ध असणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीवर दिलासाचा हातच ठेवण्यात आला आहे. खरेदी केंद्राला शेतकऱ्याचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या मनासारखा दर मिळत असल्यामुळे ते देखील खुश असल्याचे दिसत आहे.

यावर्षी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी पावसाचा तडाका तर काही ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे किसान अँप वरील नोंदणीचे अंतिम तारीख सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. यामुळे आता अधिका आधिक शेतकरी आपल्या उत्पादनाची विक्री हमीभावाने करू शकणार आहे. CCI ने स्पष्ट केले आहे की स्थानिक हवामान कापसाचे गुणवत्ता आणि उपलब्धता यानुसार टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू केली जाणार आहे. यामुळे पावसामुळे ओला कापूस दाखल झाल्यास दरामध्ये बदल केला जाऊ शकतो. अतिवृष्टीमुळे आणि पिकावरील रोगामुळे उत्पादन घसरले असले तरी हमीभाव आणि खरेदी सुरू असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी काही प्रमाणात कमी तोटा सहन करावा लागू शकतो.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन कर

Leave a Comment

error: Content is protected !!