8th Pay Commission : या तारखेला होणार आठवा वेतन लागू आली मोठी अपडेट समोर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्या आठवा वेतन आयोगाबाबत सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्यांच्यासाठी सरकारने आता आयोगाचे Terms Of Reference जाहीर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावलेले आहेत. म्हणजे, पुढच्या काही वर्षात सरकारी नोकरी असणाऱ्यांना पगार भत्ते आणि पेन्शन यामध्ये मोठी भरघोस वाढ होणार आहे. 8th Pay Commission

आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे एप्रिल 2027 पर्यंत सादर करायचा आहे. त्यानंतर हा अहवाल लेबर आणि फायनान्स मंत्रालयाकडून तपासला जाईल आणि कॅबिनेट मंजुरी नंतर लागू केला जाईल. म्हणजे 2027 च्या दिवाळीपर्यंत आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासाठी शासनाने आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजन देसाई यांना केले आहे. तर प्रो. पूलक घोष यांची पार्ट टाइम सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पंकज जैन हे सदस्य सचिव असतील. आयोगाला हवा असल्यास तो मधला काळामध्ये अंतरिम अहवाल ही देऊ शकतो, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना काही पहिले टप्प्यातील वाढ लवकरच मिळण्याची शक्यता वर्तमान देत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे दिवाळीच्या आधी सोन्याहून पिवळ मोठी भेट ठरणार आहे. 2016 मध्ये लागू झालेल्या सातवा वेतन आयोगानंतर ही सर्वात मोठी अपेक्षा सुधारणा आहे. त्यावेळी पगारात 14 ते 16 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आता मात्र तज्ञांच्या मते आठवा वेतन आयोगात वाढ आणखी जास्त असू शकते.

फिटमेंट फॅक्टर हा सगळ्यांचा मुख्य भाग असतो. वित्तीय संस्थांच्या मते यावेळी 1.8 ते.2.46 च्या दरम्यान राहू शकतो. जर 1.8 ठरला तर लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांचा पगार 18000 वरून थेट 32 हजार चारशे रुपये होईल. आणि जर 2.46 ठरला, तर हाच पगार ₹44,280 पर्यंत जाऊ शकतो म्हणजे साधारण 50 पेक्षा जास्त वाढ!

खरंतर यात फक्त बेसिक पे गणित आहे. त्यामध्ये पुढे DA HRA ट्रान्सपोर्ट अलाउन्स असे भत्ते जोडले गेले की सॅलरीतला फरक अजून मोठा होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या खिशात जाणारा खरा पैसा खूपच वाढेल. आयोग केवळ पगारावर नाही, तर बोनस, ग्रॅच्युटी, पेन्शन आणि परफॉर्मन्स लिंकड इसेटीव (PLI) यांचाही आढावा घेणार आहे. म्हणजे सेवानिवृत्त लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. सरकारी आयोगाची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करणार आहे. आर्थिक स्थिती सरकारी तिजोरीवरचा ताण आणि राज्य सरकारवर होणारा परिणाम याचा विचार करून शिफारस केली जातील. परंतु केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी हे निश्चित पुढच्या वेतन आयोगामुळे त्यांचा उत्सव दृष्टीने वाढणार आहे. 2017 च्या दिवाळीत दिवेत जळतील पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाचे दिवे लखलखतील कारण त्या वेळेपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

हे पण वाचा | 8वा वेतन आयोग लागू होणार! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस पगार! जाणून घ्या कितीने वाढणार पगार आणि किती पेन्शन

Leave a Comment

error: Content is protected !!