8th Pay Commission | केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू असलेला 8 वा वेतन आयोग आता प्रत्यक्षात लागू होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. सरकारकडून या संदर्भात मोठी हालचाली सुरू झाली असून याचा लाभ आता सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2026 पासून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच पुढच्या वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्त पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. 8th Pay Commission
केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातवा वेतन आयोग कार्यकाळात 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे. त्यामुळे 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी सरकारने Terms Of Reference मंजूर केलेले असून आयोगाला 18 महिन्याचा कालावधी अहवाल तयार करण्यासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजेच हा अहवाल आल्यानंतर एप्रिल 2017 पासून नवीन पगाराची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर केंद्र सरकार अंतर्गत 50 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 68 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा आयोग लागू झाल्यास देशभरातील कोट्यावधी लोकांना फायदा होणार आहे. आता प्रश्न असा की, या आयोगामुळे पगार किती वाढणार फिटमेंट फॅक्टर किती असेल? आणि महागाई भत्त्यावर याचा किती परिणाम होणार आहे?
तर सांगायचं झालं तर, सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. म्हणजे आधीची बेसिक सॅलरी सात हजार रुपये असणाऱ्यांची थेट 18 हजार रुपये झाली होती. तर आता यावेळी आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2. 86 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर हे झाले तर कर्मचाऱ्यांना नेहमीच बेसिक पगार 18 वरून थेट 51,480 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो!
याशिवाय सध्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ता 58% पर्यंत गेला आहे. मात्र प्रत्येक नवीन आयोग लागू होताना हा DA शून्य केला जातो आणि त्यानंतर पुन्हा गणना सुरू होते. त्यामुळे नवीन आयोग लागू झाल्यानंतर DA 0 पासून पुन्हा वाढणार आहे.
आता हे लक्षात ठेवा की, फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावर गुणाकार होऊन नवीन पगार ठरवला जातो. उदाहरणार्थ जर एखाद्या सध्याचा बेसिक 18 हजार रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टर 2.86 झाला, तर नवीन बेसिक सॅलरी जवळपास 51,480 रुपये होईल.
याचप्रमाणे पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. कारण पेन्शन ही बेसिक स्लेरीवर अवलंबून असते. जर बेसिक वाढली, तर पेन्शन आपोआप वाढतं. उदाहरणार्थ जर सध्या कोणाची पेन्शन 20000 रुपये असेल तर त्यावर 20% महागाई राहत मिळत असल म्हणजे चार हजार रुपये, तर नवीन आयोगानंतर पेन्शन तीस हजार रुपये झाली तर तिची राहत सहा हजार रुपये पर्यंत जाईल.
हा आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचारी रेल्वे कर्मचारी संरक्षण दल, CAPF तसेच केंद्र सरकारच्या योजना स्वीकारलेल्या स्वायत्त संस्था सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. सरकारकडून अंतिम घोषणा कधी होते आता हे पाहण्यासारखे राहणार आहे पण सगळ जर नियोजन प्रमाणे झालं तर 2026 च वर्ष केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सोनेरी वर्ष ठरणार आहे यात काही शंका नाही.

1 thought on “8वा वेतन आयोग लागू होणार! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस पगार! जाणून घ्या कितीने वाढणार पगार आणि किती पेन्शन”