Weather update : गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले, शेतातील उभे पीक नाहीसे झाले. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे पहाटे उठल्यावर अंगावर गारवा जाणवतोय, तर काही ठिकाणी धुक्याची चादर पसरत आहे. लोकांना पातळ चादरी गुंडाळून बसायचं सीजन सुरू झालेला आहे. याच पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने सांगितलं की राजस्थान आणि पश्चिम मध्ये प्रदेश मध्ये शितल लहरी सक्रिय झाले असून त्याचा थेट परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रावर होतोय. त्यामुळे पुढच्या काही दिवसात तापमान दोन ते तीन अंशाने खाली येणार आहे Weather update
परंतु मुंबईत मात्र चित्र थोडेसे वेगळे पाहायला मिळू शकतो पहाटे आणि सकाळी गारवा जाणवतोय पण दुपारी मात्र ऊन तापतंय लोकांना थोडा त्रास जाणवत आहे. तर सकाळी थंडगार हवा आणि दुपारी घामाघुम अशी उलट पालट परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे.
हवामान खात्याच्या नवीन आकडेवारीनुसार, मुंबईच्या सांताक्रुज येथे शनिवारी किमान तापमान 21.2 तरकुलबा येथे 23.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सांताक्रुज येथे दिवसात तापमान 34 अंशावर गेल्या म्हणजे शुक्रवारी पेक्षा दोन वर्षांनी अधिक!
मध्य महाराष्ट्रात मात्र थंडीने चांगलाच कर सुरू केला आहे जळगाव मध्ये तब्बल 10.8°c एवढा तापमान नोंदवल गेल, जे सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशाने कमी आहे! नाशिक मध्ये तापमान 13 अंशाच्या आसपास गेले, सकाळी अंगावरती शहारे येत आहेत.
मुंबईत मात्र अजूनही दिवसा उकडा जाणवतोय. भारतीय हवामान विभागाने सांगितला आहे की 14 नोव्हेंबर पर्यंत मुंबईत कमाल तापमान 32 ते 33 अंश दरम्यान राहील, म्हणजे विलासा थोडा उशिराने मिळणार आहे. रात्री आणि सकाळच्या वेळी गारवा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थंडीची पहिली झुक लागल्यामुळे आता लोकांना ब्लॅंकेट्स, स्वीटर्स. आणि गरम चहाचे कप बाहेर काढावे लागले आहेत. काही भागात तर संध्याकाळी धोक्यामुळे दृश्यता कमी होत असल्याचे नोंद झाली आहे. हिवाळी अगदी दारात उभा आहे असे स्पष्टपणे जाणवते.
हे पण वाचा | पंजाबराव डख म्हणाले, या तारखे पासून महाराष्ट्रातील काही भागात होणार अतिवृष्टी