पॅन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 31 डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करा नाहीतर पॅन कार्ड होणार बंद?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PAN Card News : पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, जर तुम्ही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड वापरत असाल तरीही बातमी नक्की वाचा. कारण भविष्यामध्ये जर तुम्ही काही महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्या नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद केले जाऊ शकते. UIDAI आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने स्पष्ट केला आहे की, 31 डिसेंबर 2025 पर्यंत व्यक्तीने आपले पॅन कार्ड आधार लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर एक जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होईल याचा अर्थ असा की तुमची पॅन कार्ड काम करणार नाही. PAN Card News

या नवीन निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावा लागेल. यामध्ये कर भरणे, कर्ज घेणे, आर्थिक व्यवहार करणे आणि इतर महत्त्वाचे व्यवहार करणे कठीण होईल. सध्याच्या काळामध्ये सरकारी सेवा आणि वित्तीय व्यवहारांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आलेले आहे. जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुमच्या वेळ घालवण्याची गरज नाही.

आधार आणि पॅन कार्ड कसा लिंक कराल

जर तुम्हीही अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक दिले नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जावा लागेल. तिथे होम पेजवर link Adhar असा पर्याय दिसेल. त्यानंतर त्यावरती क्लिक करा आणि तुमचा दहा अंकी पॅन क्रमांक व बारा अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर सर्व सूचनांचे पालन करून फार्म सबमिट करा. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड लिंक झाले आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड वेबसाईटवर जा आणि लिंकिंग विभागात जाऊन तुम्ही पाहू शकता की ही प्रक्रिया लिंक झाली आहे की नाही ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून तुम्ही कुठल्याही ठिकाणाहून सहज करू शकता.

हे पण वाचा | आता आधार कार्डवर मिळणार १०,००० रुपयांचं वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

Leave a Comment

error: Content is protected !!