तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim Card News | आजच्या काळात प्रत्येकाकडे दोन दोन तीन सिम कार्ड असतात. काही वेळा आपण स्वतः घेतलेले असतात तर काही वेळा आपल्याला माहिती नसतं की आपल्या नावरी तर कुणी सिम येतंय का. पण आता काळजी करू नका सरकारने एक जबरदस्त सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरूनच तपासू शकता की तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत. Sim Card News

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या संचारसाठी हा प्लॅटफॉर्म आता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. हा उपक्रम म्हणजे खरंतर नागरिकांसाठी एक डिजिटल सुविधाच म्हणावं. कारण वेबसाईट आणि या द्वारे तुम्ही तुमच्या नावावरती किती मोबाईल कनेक्शन आहेत हे तपासू शकता, हरवलेला मोबाईल ब्लॉक करू शकता आणि फसवणुकीपासून स्वतःच बचावू शकता.

घरबसल्या सिम कार्ड चेक करा?

सर्वात प्रथम तुम्ही या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर तिथे Citizen Centric Connection in Your Name या पर्याय वर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा टाका. Validate Captcha वर क्लिक करा . त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओ डीपी येईल आणि तो ओटीपी आणि लॉगिन करा. झालं मग पुढचं स्क्रीनवर तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत ते क्रमांकासह दिसून येईल. हे काम घरबसल्या काही सेकंदात होऊ शकतो आणि पूर्णपणे मोफत.

संचार साथी ॲपचे फायदे

या ॲपच्या माध्यमातून तीन प्रमुख सुविधा मिळत आहेत पहिली सुविधा म्हणजे Know Your Mobile Connection म्हणजे तुमच्या नावावर असलेला सिम कार्ड तपासता येतो. Block Your Lost/ Stolen Mobile म्हणजे हरवलेला फोन ब्लॉक करता येतो. Verify IMEI म्हणजे मोबाईलची ओळख खरी आहे की बनावट हे समजू शकता. हे सर्व सुविधांमुळे फसवणूक करणाऱ्यांना चांगला चाप बसणार आहे. सरकारने सांगितला आहे की हा प्लॅटफॉर्म देशातील 120 कोटीहून अधिक मोबाईल ग्राहकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला आहे.

तर आपला मोबाईल मध्ये अनावश्यक app लगेच डिलीट करा. नेहमीच फोन अपडेट ठेवा आणि सिक्युरिटी ॲप वापरा. जर भारतीय क्रमांकावरून आंतरराष्ट्रीय कॉल आला तर लगेच टोल फ्री नंबर 1963 वर कळवा. हा उपक्रम खऱ्या अर्थाने संचारसाठी ठरतोय कारण तो प्रत्येक नागरिकाला सजग, सुरक्षित आणि डिजिटल जगात सशक्त बनवतोय. म्हणून भाऊ, उशीर नको एकदा आजच या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे सिम कार्ड किती आहेत हे चेक करा.

हे पण वाचा | घरबसल्या डाऊनलोड करा आधार कार्ड! अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने; जाणून घ्या सविस्तर..

1 thought on “तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!