शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याचे ₹2,000 या दिवशी खात्यात जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आर्थिक आधार दिला जातो. प्रत्येक चार महिन्याच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या पैशातून शेतकरी शेतीसाठी आवश्यक खत, बी बियाणे, औषध विकत घेतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हप्ते जमा करण्यात आले आहेत. यानंतर शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. Beneficiary Status

सध्या मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. कारण या भागामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या पूर आणि भुस्खलनामुळे मोठे नुकसान झालं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने विशेष मदतीचा निर्णय घेत शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत दिली आहे. मात्र महाराष्ट्र गुजरात बिहार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील शेतकरी अजूनही 21 हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने यंदा स्पष्ट सांगितले आहे की, जे शेतकरी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील यांनाच हप्ता मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही ई केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल तर त्वरित पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही.

गेल्या काही हप्त्याच्या तारखा पाहिल्या तर शासनदर चार ते सहा महिन्याच्या कालावधीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करत आहे. अठरावा हप्ता 15 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांना मिळाला. विसावा हप्ता दोन ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. या पॅटर्ननुसार 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना हप्ता दिला जात नाही. त्याची कारण खालील प्रमाणे आहेत.

  • 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेले नवे मालक या योजनेत पात्र होत नाहीत.
  • एकाच कुटुंबातील दोन जण नोंदणीकृत असल्यास तपासणी पर्यंत दोघांचाही लाभ थांबतो.
  • बँक खाते आधार क्रमांक किंवा जमिनीची माहिती विसंगत असल्यास हप्ता थांबवला जातो.

म्हणूनच शेतकऱ्यांनी आपली नोंदणी स्थिती आणि पात्रता तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा मोबाईल ॲप वर जाऊन बेनिफेसरी तपासणी आवश्यक आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!