शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे ₹2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; तारीख आणि वेळ निश्चित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक लाभ दिला जातो. हा हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत वीस हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत होते. अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण पी एम किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल अधिकृत तारीख निश्चित झाली आहे.

21 वा हप्ता कधी मिळणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये येत्या 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. बिहार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा हप्ता काही दिवस लांबला असल्याची माहिती समोर आली आहे. पण आता निवडणूक पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत अधिकृतपणे तारीख जाहीर केले आहे. आज पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या हप्त्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील जवळपास नऊ कोटी होऊन अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार आहे. दिवाळीनंतर लगेच ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेक दिवसाची प्रतीक्षा संपली

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत होती की हप्ता नेमकं कधी मिळणार? काही जणांनी बँकांमध्ये जाऊन चौकशी देखील केली मात्र हप्त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहितेमुळे तारीख जाहीर होऊ शकली नाही. शेवटी आज शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे आता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील पाच ते सहा दिवसात 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 19 नोव्हेंबर रोजी जमा केले जातील. Beneficiary Status

वाढती महागाई पाहता शेतकऱ्यांसाठी ही छोटीशी रक्कम जरी असली तरी खूप मोठा आधार देत आहे. पेरणी खत अवजारे किंवा घरातील गरज भागवण्यासाठी या हप्त्याची मदत उपयोगी ठरते. शेतकरी मागील अनेक दिवसापासून हा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला का नाही कसे तपासावे?

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in भेट द्या.
  • होम पेजवर beneficiary status हा पर्याय निवडा.
  • या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक माहिती भरा.
  • त्यानंतर खाली दिलेल्या Get Data या बटणावर क्लिक करा.
  • पुढील स्क्रीनवर तुमची संपूर्ण माहिती दिसेल— हप्ता मिळाला आहे का?, ई केवायसी पूर्ण झाली आहे का?, खाते वैद्य आहे का? तुमचा हप्ता मंजूर आहे का होल्डवर आहे?

गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. जर तुमची ई केवायसी झालेली नसेल तर हप्ता अडकू शकतो. त्यासाठी जवळील सीएससी केंद्रावर जाऊन किंवा पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ओटीपी द्वारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 19 नोव्हेंबरला हप्ता मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे खाते अपडेट ठेवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!